वर्धेत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

वर्धा/प्रतिनिधी उन्हाळ्याच्या शेवटच्या माहिन्यात सूर्य आग ओकत असतानाच रविवार १२ रोजी दुपारच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. हिंगणघाट तालुक्यातील रोहनखेडा येथे वीज पडून बैलजोडी ठार झाली तर रोठा यथील गिरजा शभरकर याच्या घराचे छत उडाल्याने घराच्या भिंतींचेही नुकसान झाले आहे. आगरगाव यथील पारधी वस्ती येथील रहिवासी अचिन पवार याच्या घरावरील टिना उडून पूर्ण निकामी झाल्या आहेत. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा पसरल्याने नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतीकामांचा खोळंबा झाला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. शुक्रवार १० रोजी सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. दसया दिवशी पुन्हा उकाडा जाणवला. रविवार १२ रोजी दुपारी १ वाजता मेघगर्जनेसह जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. आर्वी, सेलू, वर्धा, हिंगणघाट, देवळी तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला.

हिंगणघाट तालुक्यात वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. रोहनखेडा येथे वीज पडल्याने शेतकरी श्रीहरी वानखेडे यांची बैलजोडी मृत्यूमुखी पडली. उन्हाळ्यात वातावरणात बदल होऊन तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. नागरिकांनाही ऐन उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाल्याचा आनंद अनुभवला. जिल्ह्यात काही ठिकाणी एक ते दीड तास पाऊस पडला. वादळामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडितसुद्धा झाला. आगरगाव येथील पारधी बेड्यावरील अचिन पवार यांना शासनातर्फे घरकुल मंजूर झाले होते. मात्र, घरावर छत नव्हते. त्यांनी काडीमोड करीत तसेच कर्जकाढून घरावर टिना टाकल्या.मात्र, आज झालेल्या वादळामुळे त्यांच्या घरावरील सर्वच टिना उडूननिकामी झाल्या. त्यामुळे त्यांच्यावरमोठे संकट ओढवले आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरीउन्हाळवाहीची कामे आटोपूनघेत आहे. अवकाळी पावसामुळे शेतीकामाचा खाळंबा होतआहे. जिल्ह्यातील काही शेतकरी उन्हाळी भाजीपाला आणि कांद्याचेपीक घेतात. या अवकाळीपावसामुळे या पिकांचेसुद्धा नुकसानहोत आहे.