आमदार सुमित वानखेडे यांच्या उपस्थितीत वर्धमनेरी येथे सौर कृषी पंपाचे यशस्वी प्रात्यक्षिक
यामुळे शेती अधिक फायदेशीर ठरणार आहे. यावेळी बोलताना आमदार सुमित वानखेडे यांनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच, या योजनेची माहिती आणि प्रात्यक्षिकाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी आर्वी विभागातील इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या कार्यकमाला वर्धमनरी आणि परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी बाधव, महावितरणच अधिकारी व कर्मचारी, तसेच जैन इरिगेशनचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी जैन इरिगेशनतर्फे देण्यात आलेल्या माहितीचे आणि सौर पंपाच्या प्रात्यक्षिकाचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांच्याकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून, हा उपक्रम यशस्वी झाल्याचे दिसून आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.