आर्वी, कारंजात कोरडवाहूच्या १० हजार शेतकऱ्यांना पाणी

आर्वी/प्रतिनिधी आर्वी आणि कारंजा तालुक्यातील जवळपास अनेक गावं ड्रायझोनमध्ये असल्यामुळे सिंचन होत नव्हते. सुमीत वानखेडे यांच्या पाठपुराव्याने जवळपास ३० गावांसाठी लोअरवर्धा येथुन लिफ्ट एरिकेशनने शेतात पाणी पोहोचणार आहे. ५०० कोटी रुपये शासनाने मंजूर केले असुन १० हजार शेतकर्यांना त्याचा लाभ होणार आहे. बेढोणा, नागझरी, तुळजापूर, गुमगाव, तरोडा, खापरी, बोथली, किन्हाळा, तळेगांव (रघुजी), नान्ही, चांदणी, पिंपलखुटा, बोरखेडी, जिवापूर, मधापूर, वाढोणा, बेल्हारा, जामखुटा, थार या गावांची ७१०६.६७ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे या भागातील कायमचा दुष्काळ संपणार आहे.

निम्न वर्धा प्रकल्पातून उपसा सिंचन याजना कायान्वित करण्याला मजुरी मिळाली आहे. वाढोणा-पिंपळखुटा उपसा सिंचन योजनेमध्ये अंबाझरी, बेढोणा, चिंचोली, हर्रासी, जामखुटा, नागझरी, पाचोड, राजनी, टिटोना, वाढोणा या गावातील २१७६.७९ हेक्टर पहिल्या टप्प्यात. वाढोणा, बेल्हारा, पांजरा, चोपन, जीवापूर, बोरखेडी, फेफरवाडा, महादापूर अशी १९१८.३२० हेक्टर जमीन दुसर्या तर बोथली हेटी, पिंपळगुटा, चांदणी, दानापूर, गुमगाव येथील, गुंडमुंड, खापरी, किन्हाळा, नान्ही, तळेगाव,तरोडा, तुळजापूर, वाढोणा यागावातील ३०११.५६० हेक्टर तिसर्याटप्प्यात काम होणार आहे. आर्वी तालुक्यातील ६१५७.४२ हेक्टरतर कारंजा तालुक्यातील ९४९.२५हेक्टर अशी एकंदरीत ७१०६.६७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.