ऐन नवरात्रात बाजारपेठेत अतिक्रमणावर हातोडा
वर्धा/प्रतिनिधी नवरात्रोत्सवानिमित्त नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता वर्धा शहर पोलिस, वाहतूक पोलिस आणि नगर पालिकेच्या वतीने शुक्रवार ४ रोजी बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे बाजारपेठेतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. सणासुदीच्या दिवसात ही कारवाई करण्यात आल्याने छोट्या व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त गेली. बाजार पेठेत अनेक दुकानांचे अतिक्रमण आहे. परंतु, त्याकडे प्रशासनाचे लक्ष गेले नाही, हे उल्लेखनिय! गोल बाजार, अंबिका चौक, पत्रावळी चौक, पटेल चौकात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करून फुटपाथवर दुकाने थाटली आहे. हातगाड्यांची संख्या तर अगणिक आहे. गोल बाजारात तर पायी चालणेही कठीण होते. हा नित्याचाच प्रकार आहे.
बाजारपठतील प्रत्यक आळीत दगची स्थापना झाली आहे. दुर्गा देवी पाहण्याकरिता शहरासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. प्रत्येक मंडळातर्फे लंगरचे आयोजन केले जाते. प्रसाद घेण्याकरिता नागरिकांची लांबपर्यंत लाइन असते. भाविकांची गैरसोय होऊ नये, याकरिता शुक्रवारी सायंकाळी अंबिका चौकापासून फटपाथवर व्यवसाय करणायाविरूद्ध अतिकमण हटाव मोहीम राबविली. यानंतर गोलबाजार, पत्रावळी चौक, पटेल चौकातील रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने हटविण्यात आली. यात काही हातगाड्या, ठेले आणि साहित्य जप्त करण्यात आले. तर अनेकांनी आपल्या हातगाड्या, ठेले स्वतःहून उचलेले. फुटपाथवर व्यवसाय करणार्यांना दुकाने न लावण्यास सांगितले. पुन्हा दुकाने जर दिसली तर सर्व साहित्य जप्त करण्यात येईल, अशी तंबीसुद्धा दिली. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.