शांतताप्रिय वर्धा जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेकीचे गालबोट
वर्धा/प्रतिनिधी देशात चाललेल्या हिंदु देवी- देवतांच्या विटंबनाचे सत्र दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. यातच वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे मस्कऱ्या गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात युवकांकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये मिरवणुकीत सहभागी पाच महिलांसह एक दीड वर्षीय मुलगी गंभीर जखमी जाल्याची खळबळजनक घटना गुरुनानक धर्मशाळेसमोर घडली. विशेष म्हणजे वर्धा येथे २६ सप्टेंबर रोजी युवा हिंदु समितीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदु देवी-देवतांवर व धार्मिक स्थळांवर होणारे हल्ले याबाबत भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातच अवघ्या सहा दिवसांनी आर्वी येथे गणपती विसर्जन मिरवणुकीवर घडलेल्या घटनेने जिल्ह्यातील नागरीकांमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे.
वर्धा जिल्हा हा अतिशय शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु आर्वी येथील घटनेचे गालबोट शेवटी जिल्ह्यात घडले. त्यामुळे समाजकंटकांचे लोण आता वर्धा जिल्ह्यात सुद्धा पाळेमुळे रोवत आहे की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. अश्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क होणे गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे आज राज्यपाल वर्धा येथे असतांना हिंदु युवा समितीद्वारा राज्यपालांना निवेदन देण्यासाठी गेले असता भेट मिळु शकली नाही. परंतु या घटनेबाबत हिंदु युवा समितीद्वारा निषेध व्यक्त करीत निषेधाचे निवदन उपजिल्हाधिकारी याच्यामाफतराज्यपालांना निवेदन देण्यात आले. तसेचजर या समाजकंटकांना तात्काळ शोधुन अटक करण्यात आली नाही तर उपोषणाचाइशारा देण्यात आलेला आहे.
आवर्ी येथील गुरुनानक धर्मशाळेसमोरगणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एकाउंच इमारतीवरुन अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. यामध्ये मिरवणुकीतसहभागी गौरी जयस्वाल, रंजीत जयस्वाल,हषिका जयस्वाल, साची जिरापर यपाच महिला जखमी झाल्या असून एक दीड वर्षीय मुलगी पुजा गंभीर जखमी झाल्याने रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. कु. साची जिरापुरे हिच्या हातालाागंभीर दुखापत झाल्याने उपचाराकरीताआर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखलकेले असून सोबतच पाच महिलांनाहीउपचाराकरीता दाखल करण्यात आलेआहे. या प्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात जमाव जमला व तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेमुळेआर्वी शहरात तणावाचे वातावरण निर्माणझालेले आहे.