भाजपविरोधात २६ पक्षांची एकजूट, ‘NDA’ ला विरोधकांच्या ‘INDIA’ ची टक्कर

बंगळुरु/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग वाजायला सुरूवात झालीय.. सत्ताधारी एनडीए विरुद्ध विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी अशी समोरासमोर टक्कर होणाराय. भाजपला सत्तेवरून हटवण्याची रणनीती आखण्यासाठी बंगळुरूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांच्या जोरबैठका सुरू आहेत. काँग्रेसप्रणित यूपीएचं नामोनिशाण मिटलंय. त्यामुळं आता इंडिया अर्थात Indian
National Democratic Inclusive Alliance च्या झेंड्याखाली विरोधकांची वज्रमूठ भक्कम होतेय. बंगळुरुमध्ये १७-१८ तारखेला विरोधकांची बैठक पार पडली. बैठकीच्या पहिल्या दिवशी अनौपचारिक चर्चा झाली. तर बैठकीच्या दुसऱ्या दिवशी महागठबंधनाच्या नावावर चर्चा झाली. बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व पक्षांच्या नेत्यांना आघाडीसाठी नाव सुचवण्यास सांगण्यात आलं होतं. अखेर दुसऱ्या दिवसाच्या बैठकीत खछऊखअ नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीला २६ पक्ष उपस्थित होते.

काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम, सीपीआय, समाजवादी पार्टी, डीएमके, जेएमएम, आम आदमी पार्टी, शिवसेना उद्धव गट, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, आरएलडी, आईयूएमएल, केरळ काँग्रेस (एम), एमजीएमके, वीसीके, आरएसपी, केरळ काँग्रेस (जोसेफ), केएमडीके, अपना दल कमेरावादी, एमएमके, सीपीआईएमएल आणि एआईएफबी अशा २६ पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्तानं सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी तब्बल दोन वर्षांनी एकमेकांना भेटल्या. तर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचीही यावेळी चर्चा झाली. विशेष म्हणजे काँग्रेसनं पंतप्रधानपदावरची दावेदारी सोडलीय. पंतप्रधानपद किंवा सत्तेसाठी ही आघाडी नसल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाजर्ुन खरगेंनी स्पष्ट केलंय. तर आधी भाजपला सत्तेवरून दूर करूया, त्यानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू, असं मत नीतीश कुमारांनी व्यक्त केलंय.