वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा) एमआयडीसी मध्ये ७५० कोटी गुंतवणूक, १५ हजार रोजगार उपलब्ध होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई/प्रतिनिधी वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्याग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस स्वरूपाचा उद्योग असून जवळपास २५ हजार कोटींची उलाढाल आहे. या कराराच्या माध्यमातन वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा)एमआयडीसी मध्ये ७५० कोटी गुंतवणूक करून जवळपास १५ हजार रोजगार उपलब्ध होणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान मेघदूत येथे वस्त्रोद्योग गुंतवणूकिसाठी राज्यशासनाचा मे.ओफए बी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात आला. यावळी आद्यागिक विभागाच प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सचिव विरेंद्र सिंग तसेच मे.ओफए बी टेक प्रा.लिमिटेड कंपनीचे अशिश मोहपात्रा, योगेश मंदानी, राजेश चावडे, विक्रम सिंग, अनुराग सोनी व एल.एल.सोनी उपस्थित होते.