दुर्गोत्सव! हजारो मंडप, गरबा अन् विविध उपक्रम

वर्धा/प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील दुर्गोत्सवविदर्भात प्रसिद्ध आहे. लगतच्या जिल्ह्यातील देविभक्त दर्शनासाठी झुंबड करीत असतात. यावर्षी १ हजार ४० मंडळ दुर्गा उत्सवासाठीसज्ज्ा झाली आहेत. सर्वाधिक ११०मंडळे हिंगणघाटला, १०२ पुलगावतर १०० वडनेर या गावात असून याठिकाणी सार्वजनिक दुर्गा मूर्ती स्थापना होते. एकूण जिल्ह्यातील १९ पोलीस ठाणा परिसरात स्थापनाहोत असून पोलीस अधिकाऱी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. तसेच१६४ ठिकाणी शारदोत्सव पणसाजरा होणार. या पुढील नऊदिवसात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते.रक्तदान, नेत्र तपासणी, आरोग्यशिबीरे आयोजित केली जातात. विविध ठिकाणी रासदांडिया,गरबा नृत्याचे आयोजनहोणार आहे. मंडप आकारासआले असून विद्युत रोषणाई वदेखावे उभे झाले आहे.महाकाली धामतीर्थ येथे आजपासून उत्सवासघटस्थापनेने आरंभ होईल.

पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्याउपस्थितीत शतचंडी यज्ञ होत आहे.छ्तीसगड तसेच मध्यप्रदेश येथून अनेक भक्त येथील महालक्ष्मी,महासरस्वती, महाकाली मूर्तीदर्शनासाठी येतात.माई भक्तांनीया उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.प्रामुख्याने या मंडळात स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या दुर्गा मूर्तिचीच प्रतिष्ठापणा केल्या जात असते. पण काही मंडळे कोलकता येथून पण मुर्त्या आणतात. त्यास विविध दागिन्यांनी सजवीण्याचे काम महिलावर्ग मोठ्या उत्साहात करतात.

वर्धा येथील या नवरात्र उत्सवाचे चर्चित वैशिष्टय म्हणजे नऊही दिवस वेगवेगळ्या मंडपात प्रसादाचा लंगर लागत असतो. त्यास अलोट गर्दी लोटते. देवी भक्त लंगरमधील प्रसाद घेण्यासाठी रांगा लावतो. मात्र या प्रसाद वाटपसाठी जे युज अँड थ्रो वाट्या ताटे वाटल्या जातात, त्याचा कचरा जमा होत असतो. तो होवू नये म्हणून हर्षाताई टावरी व त्यांच्या महिला सहकारी जागरण करीत असतात. भक्तांनी घरूनच प्रसाद घेण्यासाठी भांड आणाव, अस आवाहनत्या करीत असतात. मंडळासतशी सूचना केली जाते. निर्माण होणारा कचरा साथीच्या रोगांचा प्रसार करतो. आता गांधी जयंती निमित्यान स्वच्छता पधरवडा सरू आहे. त्याचे पण भान ठेवून दुर्गा मंडळानी प्रसाद लंगर कार्यक्रमात दक्ष असावे, असे आवाहन श्रीमतीटावरी यांनी केले आहे. या नऊ दिवसातील विविध उपक्रमातसायंकाळी होणारी गर्दी लक्षातघेऊन पोलीस सुरक्षा ठेवण्यातआली आहे.