एमडी बनवणारा मास्टरमाईंड सायबर हॅकिंगमध्येही तरबेज

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दारू आणि आता वाळू पकडण्यासाठी कायम आघाडीवर असलेल्या पोलिसांना कारंजात सुरू असलेला मादक पदार्थ बनवण्याचा कारखाना माहिती नसणे हे पोलिस प्रशासनाचे अपयशच म्हणावे लागेल. या प्रकरणाचे बींग फुटल्यानंतर मेफेड्रोन बनवणा्या त्रिकुटातील अग्रवाल नामक तरुणाच्या रंजक कथा तरुण भारतच्या हाती लागल्या आहेत.

नागपुरात एका बँकेत नोकरीवर असताना त्याने प्रत्यक खातदाराच्या खात्यातून प्रत्येकी १ रुपयाकाढला होता. हा प्रकार बँकव्यवस्थापकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला. संगणकीयदृष्ट्या अतिशय तरबेज असलेला अग्रवाल स्वत:च्या घरी मोठ्या स्क्रीनवर कोणाच्या खात्यात किती पैसे आहेत, हेपाहू शकत होता.

एवढेच नव्हे तर,त्याने कारंजातील एका राष्ट्रीयकृत बँकेला हॅक करून दिवसभरासाठी व्यवहार बंद ठेवले होते, अशी कारंजात चर्चा आहे. या प्रकरणाची पालिसात तकारदाखल करण्यात आली होती. परंतु,यात कोणताही आर्थिक घोटाळा झाला नसल्याने त्याच्यावर कारवाईझाली नाही. याशिवाय, एकानामांकीत कंपनीचे मोबाईल टॉवरहीत्याने गंमतीगंमतीत दिवसभरासाठीबंद करून पाहिले होते. त्याला फेसबुक, इन्स्टाग्राम आदीचेहीसंपूर्ण ज्ञान असल्याचे गावातील युवकांनी सांगितले.

कोणाचेहीफेसबुक आयडी हॅक झाल्यानंतर तो लिलया त्यातून बाहेर काढून देत होता. जुने फेसबुक अकाऊंट शोधणे ही त्याच्या डाव्या हाताची करामत असल्याचेही बोलल्या जातआहे तसेच परस्पर कोणाच्याही खात्यातून पैसे काढण्याची तक्रार पोलिसांकडे आल्यास पोलिसहीत्याची मदत घेत होते, असेसांगितल्या जात आहे. कारंजातील गोकुल सिटी येथे त्याने एका भुखंडावर व्यवसाय सुरू केला. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीचे तसेच केमिकल प्रॉडक्ट तयार करण्याचे काम करीत असल्याचे त्याने सांगितले होते. संगणक, मोबाईलचा बादशहा असलेला अग्रवाल मात्र समाजमाध्यमांपासून दूर होता. त्याचे फेसबुक वा अन्य कोणत्याही समाजमाध्यमावर फोटो अपलोड नाहीत, हे उल्लेखनंय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *