शेतकरी व व्यापाऱ्यांना बियाणे व डिस्ट्रीब्युटरशिपच्या आमिषाने फसवणूक करणारा पाहिजे आरोपी नोएड उत्तर प्रदेश येथून वर्धा शहर डीबी पथकाच्या ताब्यात
प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दिनांक २८.१२.२०२३ रोजी दाखल असलेल्या अपराध क्रमांक १६७४/२०२३, कलम ४२०, ३४ भादंवि या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे जसवंत सिंग, वय ३९ वर्ष, रा. तमेरी ता. जसवंत नगर, जिल्हा इटावा, राज्य उत्तर प्रदेश वाचा वर्धा शहर पोलिसांनी सातत्यपूर्ण व शिताफीने शोध घेऊन त्यास सेक्टर न १६८, नोएडा, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी हा शेतकरी व व्यापाऱ्यांच्या शेतीमाल तसेच बियाणे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी विविध परवाने व डिस्ट्रीब्युटरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून, सदर व्यवसायातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी पाहिजे आरोपी आहे. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी आजपावेतो पोलिसांचे ०४ वेळा पथक तयार करून शोध घेण्यात आला होता. परंतु आरोपी मिळून आला नाही.
त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री नागेशकुमार चतरकर साहेब यांनी वर्धा शहर पोलिसांचे विशेष पथक तयार केले. सदर पथकाने आरोपीच्या संभाव्य ठिकाणांचा बारकाईने शोध घेत सलग सात दिवस उत्तर प्रदेश व दिल्लीतील विविध ठिकाणी तपास व शोधमोहीम राबविली. आरोपीचा ठावठिकाणा मिळविण्यासाठी दिल्ली, नोएडा तसेच आरोपीचे मूल गाव तमेरी व इतर जसवंतनगर, रजमउ, बैदपूरा अशा संभाव्य ठिकाणी जाऊन माहिती संकलित करण्यात आली. आरोपी हा पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी आपले ठिकाण बदलत असल्याचे निदर्शनास येत असताना, पोलीस पथकाने उपलब्ध तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारा पर आरोपीच्या हालचालींची माग काढत मोठ्या शिताफीने त्याचा ठावठिकाणा निश्चित करून सेक्टर १६८, नोएडा येथून त्यास ताब्यात घेतले.
त्यानंतर आरोपीस स्थानिक न्यायालयासमोर हजर करून आवश्यक ट्रान्झिट वारेन्ट प्राप्त करण्यात आले असून, आरोपीस पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे आणण्यात आले आहे. सदर आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही व तपास सुरू आहे. तपासादरम्यान सदर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर, पोलीस स्टेशन हिंगणघाट तसेच राजुरा, जि. चंद्रपूर येथे काही प्रकरणांमध्ये नॉन बेलेबल वॉरंट प्रलंबित असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. तसेच सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र राज्यातील इतर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत किंवा न्यायालयीन नॉन बेलेबल वॉरंट प्रलंबित आहेत काय, याबाबत संबंधित पोलीस ठाण्याकडून माहिती संकलित करून पडताळणी करण्यात येत आहे. आरोपी अन्य कोणत्याही गुन्ह्यात पाहिजे असल्यास संबंधित पोलीस ठाण्याना त्याबाबत आवश्यक माहिती देऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदर उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुजित महादिक यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वर्धा शहर, श्री. नागेश कुमार चतरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
सदर कार्यवाही मध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. शरद गायकवाड, श्री. घनश्याम जाधव, पो. हवा/५२३ महेंद्र पाटील, पो.हवा/१४९६ अभिजित वाघमारे, पो.अं/१७१७ रंजीस भुरसे व पो. अं/१७० अमोल साळवन तसेच सावर सेलचे पोहया / १४०३ अक्षय राऊत यांनी केली.








