पिक फेरबदल केल्याने शेतीचे आर्थिक स्थैर्य टिकून राहील- जिल्हा अधिकश कृषि अधिकारी

कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा आयोजित शेती दिनाच्या औचित्याने शेतकऱ्यांचे निरसन

प्रतिनिधि/दे.जन-संग्राम वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा च्या वतीने शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील प्रगतिशील शेतकरी श्री. इरफान अली यांच्या शेतावर ‘पीडीकेव्ही अंबा’ (AMS 1001) या सोयाबीनच्या सुधारित वाणाचा गट पिक प्रात्यक्षिक क्षेत्र वर ‘शेती दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. अरविंद उपरीफर व वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कटोरे उपस्थित होते. या कार्यक्रमात परिसरातील शेतकऱ्यांना या वाणांची वैशिष्ट्ये, कीड व रोग व्यवस्थापन आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष शेतावर पाहणी करून सविस्तर माहिती देण्यात आली.

सोयाबीन चे पिडिकेव्ही अंबा हे वाण कीड व रोगांना बळी पडणारी नसून अधिक उत्पन्न देणारे वाण आहे. सध्याची पिक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी पिक फेरबदल केल्याने शेतीचे आर्थिक स्थैर्य टिकून राहील व नुकसान कमी होईल. तीळ किंवा सूर्यफूल यासारख्या पिकांचा अवलंब केल्याने कमी वेळात अधिक उत्पन्न मिळू शकते. या सोबत मधुमक्षिका पालन सारखे कृषि पूरक व्यवसाय केल्याने वर्षभर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो असा सल्ला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. अरविंद उपरीफर यांनी शेती दिन कार्यक्रमा दौरान उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कटोरे यांनी शेती दिनाचा उद्दिष्ट स्पष्ट करीत एलनिनो च्या परिस्थिती नुसार सोयाबीन पिडीकेव्ही अंबा हे इतर वाणांच्या तुलनेत कसे आहे हे प्रत्यक्ष बघितल्याने या वाणाबद्दल शाश्वती येते यावर भर दिला तसेच सोयाबीन, तूर व कपाशी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी- शास्त्रज्ञ चर्चासत्र दरम्यान शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. कृषividya विषयतज्ज्ञ डॉ. भारती तिजारे यांनी सोयाबीन पिडीकेव्ही अंबा वाणाचे वैशिष्ट्ये विशद केले तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर गट पिक प्रात्यक्षिके यशस्वीपणे राबविले.

सदर प्रसंगी प्रगतिशील शेतकरी श्री. इरफान अली यांनी सोयाबीन चे पिडिकेव्ही अंबा हे वाण टोकन यंत्राद्वारे पेरल्याने ओळींची संख्या जास्त भरली व एकरी ८ ते ९ कि. उत्पादन येण्याची हमी दर्शविली. शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य श्री प्रीतम कडू यांनी रुंद वरंबा व सरी चा अवलंब केल्याने काव फायदे झाले याविषयीचा अनुभव कथन केला.

पिक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. नीलेश वझिरे यांनी चारकोल रॉट व्यवस्थापन, ट्रायकोडर्मा चा वापर या विषयी भर दिला तसेच तूर पिकातील खोडावरील करpa, कापाशीतील रस शोषण कीड, गुलाबी बॉन्ड अळी नियंत्रण व उपाययोजना व रब्बी हंगामातील पिक व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र विषयतज्ज्ञ डॉ. सचिन मुळे यांनी जनावरांना मुक्त संचार गोठा पद्धतीने ठेवल्यास जनावरांना आवश्यक असेल तेव्हा ते चारा खाऊ शकतात व पाणी पिकू शकतात ज्यामुळे दूध उत्पादनावर अधिक फरक पडेल असे मार्गदर्शन करीत जनावरांचे खाद्य निर्मिती, विविध प्रकारचे चारा लागवड व त्याचा दुग्ध जनावरांना होणारा फायदा व एलनिनो दरम्यान जनावरांकरिता करावयाच्या उपयोजना यावर भर दिला.

सदर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार विस्तार शिक्षण विषयतज्ज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता श्री. सुधीर बोबडे, श्री. सौरभ कडू, श्री. अजय झाडे, श्री. काटकर, कु. भारती सावरकर, कु. स्रेहल इंगोले, श्री गजेंद्र मानकर, श्री. गणेश वायरे, श्री. वैभव चौधरी व ग्रामस्थांनी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *