येत्या १५ दिवसांत सेमी इंग्रजीचे पुस्तके विद्यार्थ्यांना न मिळाल्यास पं.स. शिक्षण विभागात भरणार विद्यार्थ्यांची शाळा!

किशोर सुरकार देवळी : देवळी तालक्यातील प.स. शिक्षण विभागाच्यासावळागोंधळामुळे १ जुलैपासून शाळा सुरु होऊनसुद्धा अद्यापपर्यंत २ महिने झाले परंतु अद्याप वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीचे पुस्तके वाटप करण्यात आलली नाहीत. याबाबत दि. १५ जुलै रोजी व दि.३०जुलै रोजी “दै.जन-संग्राम’ वृत्तपत्रात याबाबत बातमीप्रकाशित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिकनुकसान होत असून शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरीता पालक वर्ग मात्र आता आक्रमक होत असून आज दि.३०ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पारीसे आणि पालक वर्गातर्फे किशोर सुरकार तसेच इतर नागरिकांनी पं.स. समिती देवळीच्या शिक्षण विभागात धडक दिली. तसेच येत्या १५ दिवसांत जर विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाही तर सेमी इंग्रजीच्या शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना घऊन प.स. समितीदेवळी येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला व आता अधिकाऱ्यांनीच विद्यार्थ्यांना व पालकांना विना पुस्तके कसे शिकवायचे याचे प्रात्यक्षिक द्यायला लावणारअसल्याचे पालकांनी सांगीतले.

गटशिक्षणाधिकारी राजेश रेवतकर यांना विद्यार्थ्यांचेशैक्षणिक नुकसानाबद्दल माहिती दिली असता त्यांच्याकडन पाठ्यपुस्तक महामंडळाकडून अद्यापपर्यंत सेमीइंग्रजीची पुस्तके उपलब्ध न झाल्याचे सांगण्यात आले. परंतु आठवड्याभरात विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविण्यात यतील अस सांगीतल. परत प्रश्न असा आह की,पाठ्यपुस्तक महामंडळाकडून सेमी इंग्रजीची पुस्तकेच जर उपलब्ध होणार नसतील तर विद्यार्थ्यांना पुस्तके कुठून आणून देणार? वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफतपाठ्यपुस्तके देण्याची योजना आहे.

त्याकरीतादरवर्षी वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना शिक्षणविभागाकडून पाठ्यपुस्तके पुरविली जातात. परंतुयंदा देवळी तालुक्यातील सेमी इंग्रजी माध्यमांच्याशाळांना मराठी माध्यमांची पुस्तके आली. त्यात भर म्हणजे ती पुस्तके देवळी पंचायत समितीतील शिक्षण विभागाने घेऊन ती मराठी माध्यमांची पुस्तके सेमी इंग्रजीमाध्यमांच्या शाळांना देणे सुरु केले आहे…. ती मराठी माध्यमाची पस्तके आता समी इगजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्याअधिकाऱ्यांकडून शिक्षकांना असे सांगण्यात आलेले आहे की, मराठी माध्यमातूनच तुम्ही इंग्रजीचे शिक्षण द्या… या हास्यास्पद प्रकारामुळे आता शिक्षकांची मात्र चांगलीच भंबेरी उडालेली आहे की, आता विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे?… पालक म्हणतात की, आमचा मुलगा तर सेमी इंग्रजी माध्यमात आहे आणि पुस्तके मराठी कशी? यातून बरेचदा शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आपले महाराष्ट्रातील गतिमान सरकार विद्यार्थ्यांप्रती किती सजग आहे आणि विद्यार्थ्यांप्रती शिक्षण विभाग किती जागृत आहे याचा प्रत्यय येत आहे.

कोणीही यावर वाच्यता करण्यास तयार नाही आहे. प्रशासनाकडे विचारणा केली असता आम्हाला अजूनपर्यंत पुर्ण पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात येते तर काही ठिकाणी शाळांनी पुस्तकांची मागण्यांची आकडेवारी दिली नसल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात हा प्रश्न उपस्थित होतो की, शिक्षण विभागाजवळ दरवर्षी किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याची आकडेवारी असते आणि त्यानुसार पुस्तकांची मागणी किंवा जास्त पुस्तकांचा स्टॉक का ठेवल्या जात नाही हा प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बघता आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पारीसे व पालक वर्गातर्फे किशोर सुरकार तसेच इतर पालकांनी आतातरी शिक्षण विभागाने जागे व्हावे याकरीता पं.स. देवळी शिक्षण विभागात विद्यार्थ्यांची शाळा भरविण्याचा इशारा दिलेला असून शिक्षण विभागाने आतातरी जागे व्हावे असे म्हटले आहे अन्यथा पालकांच्या तीव्र रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल हे पक्के!