संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर च्या वतीने तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळावा संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : समाजाचे हित लक्षात घेऊन जे रंजलेले, गांजलेले, वंचित, दुःखी, कष्टी, दुबळे लोक आहेत त्यांना संस्थेच्या माध्यमातून मदत व्हायला हवी, त्यामुळे समाजसेवेला गती येते व ती समाजाच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी महत्वाची ठरते, संस्थेच्या माध्यमातुन उपवधु वर व पालक परीचय माध्यमातुन समाजातील आपल्या समाजबांधवांना एक प्रकारे आपण मोठी मदत करीत असतो, समाजातील युवक-युवती व पालकांना एकत्र आणून योग जुळवणीसाठी एक सुंदर व्यासपीठ उपलब्ध करुन देणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे,

या माध्यमातुन मुला-मुलींचे विवाह जोडण्यास मदत होते, तसेच समाजाच्या व संस्थेच्या हितासाठी अनेक लोक आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घालत असते, त्यांचाही योग्य सन्मान करणे आवश्यक आहे, समाजाला एकत्रीत करण्यासाठी जे काही चांगले कार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा आणि आदर्श जीवन जगा असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले ते उप वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात बोलत होत वर्धा येथे संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर च्या वतीने तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मा. खासदार रामदास तडस, कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार सुरेश वाघमारे, प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शेखर शेंडे, कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, श्री. रविकांत बालपांडे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, श्री. प्रविण हिवरे, सतिश हरणे, कमलेश आकरे, संस्थेचे अध्यक्ष शैलेन्द्र झाडे, धनश्याम घंगारे, उपस्थित होते.

सर्वप्रथम श्री संताजी जगनाडे महाराज यांची मूर्तिला माल्यार्पण व विधिवत पूजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रृणानुबंध-२०२६ वधुवर परिचय पुस्तकाचे विमोचन करण्यात आले व वधुवरांनी आपला परिचय दिला. यावेळी माजी खासदार श्री. सुरेशजी वाघमारे, श्री. शेखर शेंडे, श्री. प्रविण हिवरे, रवीकांत बालपांडे, एकनाथ टिकले यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक संस्थेचे अध्यक्ष शैलेन्द्र झाडे यांनी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विद्या नरड यानी केले तर उपस्थितांचेआभार जगन्नाथ लाकडे यांनी केलेख् यांनी मानल.

कार्यकम यशस्वी करण्याकरिता संस्थेचसचिव हरिष हांडे, कार्याध्यक्ष अतुल पिसे, कोषाध्यक्ष नितीन साटोणे, संघटक सुरेंन्द्र खोंड, उपाध्यक्ष सौ. पुष्पाताई डायगव्हाने, उपाध्यक्ष किशार गुजरकर, सहसचिव जगन्नाथलाकडे, संचालक चंद्रकांत चामटकर, संघटकविनायक तेलरांधे, संचालक सौ. शोभा तडस,संचालक सुधिर चाफले, संचालक सचिनसुरकार, संचालक प्रशांत बुरले, संचालकसुनिल शिंदे, तसेच मनिष तेलरांधे, संजयआष्टनकर, सुनिल ढवळे, भाष्कर भांगे, रमेश जांभुळकर, सुभाष महाकाळकर, प्रमोद खोडे,विपीन पिसे यांनी प्रयत्न केले, कार्यक्रमाला उप वधु-वर तसेच मोठया संख्येने पालक व समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *