गुजरातमध्ये २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली असून तब्बल २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कासळल आह. एअर इडियाच ह्या विमानान अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी १.३१ वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळलं. या दुर्घटनेनंतर काही वेळातच ३ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही दिले. गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असन ७०० फटावरुन मघानीनगर ह्या नागरी वस्तीत हे विमान कोसळलं. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

विमानातन १० क मबरासह तब्बल २४२ प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून, जिथे प्लेन क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे, घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झाल आहत. मात्र, या दघटनेत माठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात यत आह. अहमदाबादहन लडनला म्हणजच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला. विशेष म्हणजे विमान दुर्घटनेपूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी आपत्कालीनचा संदेश (मे डे कॉल) दिला होता. कॅप्टन सभरवाल यांना तब्बल ८२०० तासांच्या प्रवास उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने दुपारी १.३१ वाजता उड्डाण केल्यानंतर १.३८ मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर, ही दुर्घटना घडली. एअर इंडियाचं हे विमान एका इमारतीवर कोसळलं असून ती इमारत रुग्णालयाची असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयातील १५ डॉक्टर जखमी झाले असून काही रुग्णांना दखील गभीर दखापत झाल्याची माहिती आह. अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारं एअर इंडियाचं फ्लाइट १७१ आज अपघातग्रस्त झालं, या दुर्घटनेची मी अत्यंत दुःखद मनानं पुष्टी करतो. या विनाशकारी घटनेत बाधित झालेल्या सर्व प्रवाशांच्या कुटुंबियांसह आणि प्रियजनांसोबत आम्ही आहेत. सध्या, आमचे प्राथमिक लक्ष सर्व दुर्घटनाग्रस्त प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यावर आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या आपत्कालीन प्रतिसादपथकांना मदत करण्यासाठी आणि दुर्घटनाग्रस्तप्रवाशांना आवश्यक अशी सर्वोतोपरी मदत प्रदान करण्यासाठी आम्ही शक्यतो सर्वप्रयत्न करत आहोत. या दुर्घटनेची अधिक माहिती घण्याचा आम्ही प्रयत्न करत आहातअधिक माहिती मिळताच पुढील अपडेट्स आम्ही शेअर करू.

एक आपात्कालीन केंद्र तात्काळ सुरू करण्यात आलं आहे. तसेच, दुर्घटनाग्रस्त प्रवाशांबाबत माहिती घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठीपथकं नेमण्यात आली आहेत. अहमदाबाद विमानतळावरून दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी ह्या विमानानं लंडनसाठीउड्डाण केल्यानंतर काही वेळातच हा अपघातघडला. अहमदाबाद विमानतळाबाहेरीलमेघानीनगर रहिवाशी परिसरात विमानाचाअपघात झाला. अहमदाबाद विमानतळावरूनउड्डाण केल्यानंतर मेघानीनगरचे अंतर अंदाजे१५ किलोमीटर आहे, येथेच हा अपघात झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *