२ हजार ५८८ कोटी ५५ लाख रू. निधीतून विकासकामे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध २१ कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन, अद्ययावत व सुसज्ज्ा इमारतीचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वागत कक्ष, हिरकणी कक्ष, आनंदी कक्ष, आवश्यक दस्तऐवज मिळण्यासाठी किऑस्क सुविधा आदींचे निरीक्षण केले. त्यानंतर नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी ऑनलाईन पध्दतीने विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. अकोला यथील तहसील, तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीचे तसेच महिला व बालविकास भवनाचे लोकार्पण झाले. पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
सुमारे ४५४.६२ कोटी रूपयांच्या निधीतून सिंचनाची व्यवस्था निर्माण होऊन शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशोधनाचा वारसा असलेल्या अकोला भूमीत २४९.४१ कोटी रूपये खचर्ून बांधण्यात आलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने झाला. अकोला शहरात अमृत २.० योजनेत ६२९.०६ कोटी रू. निधीतून मलनि:सारण (टप्पा-१) चे काम, तसेच शहरासाठी १८.९९ कोटी रू. निधीतून प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेत ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन झाले. त्याचप्रमाणे, १५ कोटी रू.निधीतून अद्ययावत सांस्कृतिक भवन, सुमारे ९.९६ कोटी रू. निधीतून ऑलिंपिक दर्जाचा तरणतलावाचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.
“हायब्रीड न्युइटी’अंतर्गत मुर्तिजापूरदहिगाव-गुडधी-उमरी- अकोला राज्य महामार्ग २८४, तसेच अकोला-मलकापूर- कानशिवणी-मोरगांव काकड- बोरगांव खुर्द जिल्हा प्रमुख मार्गाची सुधारणा ४१०.१० कोटी रू. निधीतून होणार आहे. त्याचे भूमिपूजन यावेळी झाले. त्याचप्रमाणे, उकळी बाजार-नेर- नांदखेड- किनखेड राज्य महामार्ग २७८, किनखेड ते दहिहंडा महामार्गाची सुधारणा, अकोट मतदारसंघातील राज्यमाग क.४७ रावर, पातडा, पिंपळगाव, खांडवी, जळगाव जामोद- हिवरखेड- अकोट या मागावरील (रभापर त हिवरखड त वारखड भाग) सुधारणा ३११.४४ कोटी निधीतून होत आह. बाशिटाकळी शहरात ९.९९ कोटी रू. निधीतून मुख्य रस्ता होत आहे. या कामांचे भूमिपूजन झाले. सर्वोपचार रुग्णालयात १५१.५६ कोटी रू. निधीतून नवीन वॉर्ड इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.
यामुळे रुग्णांसाठी सुविधा निर्माण होणार असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. अकोला येथे १२९.२३ कोटी निधीतून पोलीस अधिकारी व कर्मचा-यांसाठीदक्षतानगर यथ २४६ निवासस्थान व परिसविकासकामांमुळे कर्तव्याप्रती २४ तासबांधील असणा-या पोलीसांसाठी निवासाचीसोय निर्माण होणार आहे. तसेच ५ कोटी खर्चाचे अकोला तालुका क्रीडा संकुल या कामांचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्र्यांच्याहस्ते झाले. मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोरडे, तसेच पारद येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन व बार्शिटाकळी तालुक्यातीलभेंडीमहाल येथे ४५ कोटींच्या १० मेगावॅट क्षमतेच्या व रेडवा गाव येथे ९ कोटींच्या २ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्तेझाले.
अकोला जिल्ह्यातील अकोला वअकोट या दोन शहरांमध्ये ९ कोटी रू. निधीतून सीसीटिव्ही प्रकल्पाचे लोकार्पणही यावेळी झाले. प्रारंभी पालकमंत्री तथा राज्याचे कामगारमंत्री ड. आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारीअजित कुंभार यांनी मेळघाटातील प्रतिकृती भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या अकोला विमानतळयेथे आगमनप्रसंगी पालकमंत्री ड. फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाशभारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, आमदारवसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक,माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील,जिल्हाधिकारी अजित कुंभार आदींनीस्वागत केले.