आचार्य विनोबा भावे उड्डाण पुल स्वप्नपूर्तीकडे!

वर्धा/प्रतिनिधी स्थानिक बजाज चौकातील रेल्वे उड्डाणपुलावर वाहतुकीला नेहमीच अडथळा होत होता. त्यामुळे जुना पूल कायम ठेवून नवीन पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, आता काही महिन्यांपासून या कामाला वेग आला आहे. स्टील गर्डर लाइन जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बुब यांनी दिली. शहरातील बजाज चौकातून हिंगणघाट, यवतमाळकडे जाणार्या रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगवर पूल बांधण्यात आला. मुंबई-हावडा ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणानंतर जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात आला. मात्र शहराचा विस्तार आणि लोकसंख्येसह वाहनांची वाढती संख्या यामुळे या पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर बांधण्यात आलेला पूल रिकाम्या भागात सरकवून रेल्वे मार्गावर टाकण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित काम पूर्ण करून दोन महिन्यांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.                           शहरातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाचे काम कोरोनाच्या काळात बंद झाले होते. खा. तडस यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी या कामाला सुरुवात झाली. उड्डाण पूल बांधण्याचे काम निकषानुसार केले जात आहे. बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या देखरेखीत रात्रंदिवस काम सुरू आहे. स्ट्रीट गर्डर लाईन जोडण्याचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. रेल्वे विभागाकडून अजून कोणताही अडथळा न आल्यास उर्वरित कामे पूर्ण करून मे महिन्याच्या अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यताही बुब यांनी व्यक्त केली. होते. त्यामुळे नवीन पूल बांधण्याची मागणी होत होती. त्यानंतर रेल्वे विभागाने जुना पूल तसाच ठेवून विस्तारीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला होता. हे काम सन २०१६ मध्ये सुरू करण्यात आले. २०१८ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होणार होते. मात्र रेल्वे विभागाने स्ट्रीट गर्डर लाईनच्या रचनेत वारंवार बदल केले. त्यामुळे कामाला विलंब होत होता. नंतर कोरोना संकटामुळे अनेक महिने काम बंद पडले. मात्र काही महिन्यांपूर्वी रस्त्यावरील गर्डर लाइनचे काम वेगाने सुरू आहे. कंपनीकडून मागवण्यात आलेले छोटे-छोटे भाग एकत्र करण्याचे काम सुरू आहे. ३१ मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात