पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा दौरा कार्यक्रम

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वधा : राज्याचे गृह (ग्रामीण),गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकारव खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचेपालकमंत्री डॉ.पंकज भोयर उद्या दि.१७ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

बुधवार दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत सालोड (हिरापूर) येथे आयोजित मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान शुभारंभ कार्यक्रम व ग्रामसभेस उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता साई मंदिर येथे सेवा पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १२ वाजता विकास भवन येथे सेवा पंधरवडा निमित्त आयोजित पट्टे वाटप कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी१ वाजता जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृह येथे पोषण माह कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहतील. सायंकाळी ६ वाजता रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *