रामनगर पोलिसांनी कुख्यात गुंड अयाजची काढली धिंड
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : पोलीस स्टेशन रामनगर येथील खुनाच्या प्रयत्नातील मास्टर माईंड कुख्यात गुंड अयाज शेख हा पोलिसांनी गुंगारा देऊन गुन्हा घडल्यापासून फरार होता तो स्वतःला शातीर चालबाज समजून वारंवार आपले लोकेशन बदलवत होता.या फरार आरोपीस रामनगर पोलिसांनी अथक प्रयत्न करीत गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक शक्कल लढवत शोध घेऊन अटक केली. अयाज उर्फ बबलू रफिक शेख वय ४२ रा खडसे लेआउट गजानन रेसिडेन्सी वर्धा याचे विरुद्ध वर्धा शहर रामनगर या ठिकाणी खुणाचा प्रयत्न,खंडणी धमकी देणे,हत्यार बाळगणे इत्यादी गंभीर गुन्हे दाखल आहे.त्याचा वर्धा शहरातील इतवारा बाजार परिसरात चांगली दहशत आहे तो स्वतःला मोठा गुंड समजतो व एका कुख्यात गुंडाच्या नावाखाली जबरी वसुलीचा गोरखधंदा चालवितो.
रामनगर पोलिसांनी त्याचा माज चांगलाच मुरविला, कुख्यात गुंड अयाज शेख याची इतवारा परिसरातील लोकांच्या मनात असलेली दहशत संपण्यासाठी त्याची मुख्य मार्गाने वर्दळीच्या ठिकाणातून धिंड काढून कोणताही गुंड मोठा नसतो, घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा संदेश रामनगर पोलिसांच्या कार्यप्रणालीतून दिसून आला या कारवाईमुळे इतवारा परिसरतील लोकांनी पोलिसांची प्रशंसा केली व लोकांनी सुद्धा अशा गुंडांना घाबरून पळू नये व त्यांच्यामार्फत होणाऱ्या अन्यायाला घाबरू नये तसेच त्यांचे विरुद्ध समोर यावे, पोलीस प्रशासन सदैव आपल्या सेवेत तत्पर राहील असा संदेश रामनगर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावून दिला आहे..









