अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलांना न्याय मिळेल- अध्यक्षा रुपाली चाकणकर
आपल्या तक्रारींसाठी महिलांना मुंबईत येणे देखील सोईचे नाही. त्यामुळे जिल्हास्तरावरच महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरीता प्रत्येक जिल्ह्यात जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत आहे. जनसुनावणीमुळे महिलांच्या वेळ वाचून खर्चाची बचत होण्यासोबतच प्रत्यक्ष जागेवर न्याय मिळणार आहे. यामुळे महिलांवर होणारे अन्याय व अत्याचाराला न्याय मिळेल, असे पुढे बोलतांना रुपाली चाकणकर म्हणाल्या. प्रत्येक उद्योग, व्यवसाय व आस्थापनांमध्ये महिला कार्यरत आहे. अशा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिंक अत्याचाराच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कायद्यानुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रारी निवारण समिती गठीत करणे बंधणकारक आहे. या समित्यांच्या कामाचे परिक्षण करण्यासाठी नुकताच शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे आता कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होऊन आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यास मदत होणार आहे, असे श्रीमती चाकणकर म्हणाल्या.
अन्याय करणाऱ्यांसोबत अन्याय सहन करणारा तवढाच जबाबदार आहे. त्यामुळे महिला बाई म्हणन लढत असतांना आई म्हणून देखील अन्यायाविरुध्द लढली पाहिज. महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. आपल्याकडे विधवा प्रथा अजूनही पाळली जाते. महिलेवर अन्याय करणारी ही प्रथा बंद करण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढे आले पाहिजे. एखाद्या महिलेने तक्रार केली असेल तर ती तक्रार नसून तिचे भविष्य आहे, याभावनेने प्रशासनान तकारीवर कारवाइ कली पाहिजे, असे श्रीमती चाकणकर म्हणाल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध कायद, याजना राबविण्यात येतात. देशात महाराष्ट्र हे महिला सक्षमीकरणामध्ये पुढे आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिलांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यातील महिलांनी कुठलीही भिती न बाळगता पुढे येऊन आपल्या तक्रारी प्रशासनासमार मांडाव्यात. त्याच्या तक्रारींचे नक्कीच निराकरण करण्यात येइल अस, वान्मथी सी म्हणाल्या. महिला आयोग आपल्या दारी हा एक स्तुत्य उपक्रम आहे.
यामुळे महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यास मदतहोणार आहे. जिल्ह्यात महिलांच्यासमस्यांचे निराकरण करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आलेअसून काही तक्रारी समोपचाराने निकाली काढण्यास मदत होतअसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी सांगितले. प्रास्ताविकात उपसचिव डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी जनसुनावणी मागची भूमिका विषद केली.संचलन सुजाता देशमुख यांनी केलेतर आभार मनिषा कुरसंगे यांनी मानले.









