सावंगी मेघे पोलीसांकडुन गौण खनीज (रेती) चे अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दि. १९.०९.२०२५ रोजी रात्रीचे सुमारास पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील डी.बी. पथक पो.स्टे परीसरात अवैध वाहतूक संबंधाने पेट्रोलींग करीत असता त्यांना मुखबिरकडून माहिती मिळाली की एका हिरव्या रंगाच्या ट्रॅक्टरमध्ये मौजा सुकळीबाई येथील धाम नदीचे पात्रातून काळी रेतीचा उपसा करून रेती अवैधरीत्या ट्रॅक्टरमध्ये भरीत आहे.

अशा माहितीवरून पंच व पो. स्टाफसह मौजा सुकळीबाई येथील धाम नदीचे पात्राजवळ जावून पाहणी केली असता तेथे अवैधरीत्या रेतीचा उपसा करून रेती ट्रॅक्टरमध्ये भरीत असता दिसून आले, त्यावरून आरोपीचे ताब्यातून १) एक हिरव्या रगाचा प्रित कंपनीचा ट्रक्टर क एम.एच. ३२ ए.एच ६४५५ व ट्रॅक्टरची ट्रॉली क. एम.एच. ३२ ए.एस ४६२९ एकुण किं. ७,००,०००/ रू. २) अर्घा ब्रास (५० फुट) काळी ओलसर रेती किं. ३५००/ रू. असा एकुण जु.किं. ७,०३,५००/ रू. चा मुद्देमाल शासनाचा महसुल चुकवुन संगणमताने रेतीची (गौणखनीज) अवैद्यरित्या बिना पासपरवाना रेतीची चोरी करतांना मिळुन आल्याने आरोपी ट्रॅक्टर चालक १) संजय भाउलाल गिरी वय ३३ वर्ष रा. आंजी मोठी, ता.जि. वर्धा व ट्रॅक्टर मालक २) रमेश रूपरावजी डबूरकर वय ४९ वर्ष रा. आंजी ता. जि. वर्धा यांचे विरूध्द पा.स्टे. ला अप.क. ७५४/२०२५ कलम कलम ३०३ (२) ३५) बि.एन.एस. सहकलम ४८(७), ४८(८) महा. जमिन महसूल अधि. १९६६, सहकलम ४, २१ खान खनिज अधि. १९५७, सहकलम ३(१), १८१ मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे पोउपनि सतिष दुधाने व गुन्हे शोध पथकाचे पो.हवा संजय पंचभाई, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, यांनी केलेली असून गुन्हयाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *