गांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने हिंगणघाट येथील संत कबीर वार्डातील एका घरी छापा टाकूण गांजा, मोपेड, मोबाईल, असा १ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुड्डू सूर्यवंशी (३२) याला अटक केली. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणार्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गन्ह शाखस आदश दिल आहत. शुक्रवार १९ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. गोपनीय माहितीच्या आधारे गुड्डू सूर्यवंशी (३२) रा. संत कबीर वार्ड याच्या घरी छापा टाकला. घराची झडती घेतली असता प्लास्टीक पिशवीमध्य गांजा मिळून आला.

हा गाजा एम.एच. ३२- ए. व्ही २१३० या क्रमांकाच्या दुचाकीने नागपूर येथे जावून तेथील ताजबाग गेट जवळ राहणार्या रफिक नामक इसमाकडून विक्रीकरिता खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातून १ किलो ३३० ग्रॅम गांजा, दुचाकी, मोबाईल असा १ लाख ४१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलिसअधीक्षक अनुराग जैन,अप्पर पोलिस अधीक्षकसदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी,पोलिस उपनिरीक्षक सलामकुरेशी, पोलिस कर्मचारी अरविंदयेनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, अभिषेक नाईक यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *