
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : शहरामधील गांधी पुतळा परिसरात वाहतूक पोलीस शाखेकडून ‘ड्रॅन्क ड्राइव्ह’ करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालक सुरेश महादेव गजर वय ३० वर्ष राहणार राजीव नगर सावंगी मेघे वर्धा हा मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवीत होता.वर्धा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला गांधी पुतळा परिसरात रोखले.सदर वाहन चालकविरुद्ध मोटार वाहन अधिनियम कलम १८५ अंतर्गतकारवाई करण्यात आली. सदर कारवाई विलास पाटील पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनात पोलीसहवालदार शब्बीर सय्यद, पालीस शिपाइ अकितसिंगठाकूर, दिलीप कामडी, किशोर माहूरकर यांच्या मार्फत करण्यात आली.