देवळी नगर परिषद क्षेत्रातील नझुल जमिनीवर अतिक्रमन करुन वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना कायमस्वरुपी पट्टे द्यावे
त्यांची अडचन लक्षात घेऊन माजी खासदार रामदास तडस यांनी महसुलमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची मंगळवार दिनांक १६ मुंबई येथे भेट घेऊन देवळी येथील इंदिरानगर, बसस्टॉप मागील खडकाळा, मिरनथान मंदीर मागील बेघर व परीसर, केदार लेआऊट, काळापूर परीसरातील नागरिक अनेक वर्षांपासून जमिनीवर राहत आहेत आणि त्यांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर कायमस्वरुपी पट्टे देण्यात याव, त्यामळ प्रधानमत्री आवास योजन अतगत लाभ मिळेल, यासाठी पंतप्रधान श्री. नरेन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवस १७ सप्टेंबर राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची जयंती निमीत्य २ ऑक्टोबर या कालावधीत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कार्यक्रमात नझुल जमिनीवर वास्तव्य करणा-या देवळी येथील नागरिकांना कायमस्वरुपी पट्टे देण्यात यावी अशी मागणी केली,
यावर महसुलमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी नझुल जागेवर राहणा-या नागरिकांना कायमस्वरुपी पट्टे देण्यात येणार असुन देवळीतील नागरिकांना सुध्दा कायमस्वरुपी पट्टे देण्यात येईल असे आश्वासन माजी खासदार रामदास तडस यांना दिले. देवळी नगर परिषद क्षेत्रात अनेक ठिकाणी ५० वर्षापासून नझुल जमिनीवर अतिक्रमन करुन वास्तव्य करीत आहे, परंतु त्यांना हक्काचे पट्टे नसल्यामुळे पतप्रधान आवास याजना व अन्य काणत्याही याजनचा लाभ मिळत नाही, त्यामुळे त्यांना कायमस्वरुपी पट्टे मिळणे आवश्यक आहे, राज्यशासनव्दारे नझुल क्षेत्रातील अतिक्रमन धारकास कायमस्वरुपी पट्टे देण्याबाबत निर्णय घेतला आहे, या विषयाकरिता महसुलमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेतली असुन लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार असयाचे यावेळी माजी खासदार रामदास तडस म्हणाले.









