समुद्रपूर येथे लव्ह जिहाद विरोधात चेतावनी मोर्चा
प्रणय बालपांडे/दै.जन-संग्रामसमुद्रपूर : तालुक्यातील एका गावात घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाच्या निषेधार्थ काल समुद्रपूर येथे विविध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने भव्य चेतावनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील हिंदू समाजात व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व मुलीला पालकांस सोपविण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. समुद्रपूर मध्ये जास्तीत जास्त हिंदू समाज राहत असून मुस्लिम समाज फक्त चार घरे आहात हे विशेष.
मोर्चामध्ये मोठ्या संख्येने हिंदू समाज, नागरिक, हिंदू स्त्रिया, तरुण सहभागी झाले होते. घोषणाबाजीद्वारे उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वक्त्यांनी आपल्या भाषणातून हिंदू धर्मियांच्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून धर्मांतर करून मुस्लिम बनवण्यात येत आहे अश्या वाढत असलेल्या घटनांबात चिंता व्यक्त करत युवक-युवतींमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून संबंधित प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत नागरिकांनी प्रशासनास चेतावनी देऊन आपला निषेध नोंदविला. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता.








