राज ठाकरे-मोदी एकाच मंचावर; मुंबईच्या शिवाजी पार्कात तोफ धडाडणार

मुंबई/प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहे. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या सभेत जनतेला संबोधित करणार आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीची मुंबईत सांगता सभा होणार आहे. यासाठी मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत, त्यांचा मुंबईत रोड शो देखील होईल. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी १७ मे रोजी मुंबईत भव्य सभा पार पडणार आह. मुबई, ठाण आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी निवडणक प्रचाराच्या दृष्टिकोनातून ही सभा खूप खास असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेशिवाजी पार्क मैदानावरील भव्य मंचावरून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील जनतेला संबोधित करणार आहेत.