नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली/प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला. केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानावरील कर्मचाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. याआधीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या संदर्भात माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन करी यांच्या कर्मचार्यांनी पोलिसांना त्यांच्या निवासस्थानी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची माहिती दिली होती.