बोरखेडी, बांबर्डा, चामला गावात भिषण पाणीटंचाई

तळेगाव (श्या.पं.)/प्रतिनिधी कारंजा (घा.) तालुक्यातील जसापूर तलाव कोरडा पडल्याने बोरखेडी, बांबरडा आणि चामला गावात भिषण पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. या तलावात १५ दिवस पुरेल एवढाच जलसाठा असल्यान दहा दिवसानतर एकदाच पाणी मिळत असून गुंडभर पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. आष्टी तालुक्यातील बोरखेडी, बांबरडा, चामला ही गावे गेल्या ७० वर्षांपासून तहानलेली आहे. या गावांचा पाणी प्रश्न अजूनही कायम आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह शेतीसाठी, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायम आहे.जिल्ह्याचे तापमान सध्या ४३ अंशावर गेले. या कडक उन्हात नदी, नाल, विहिरींनीही तळ ठाकलआहे. अशातच जसापूर तलावात १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावात नळ योजना आली पण नळाला पाणी नाही. १९६२ पासून या भागात तलाव निर्माण व्हावा म्हणून महादेव ताईवाडे यांनी पाठपुरावा केला.

मात्र, या भागात तलाव निर्माण होऊ शकला नाही. चार वर्षांपूर्वी जसापूर तलावातून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, यावर्षी जसापर तलाव कोरडा पडला. तलावात १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यान तिनही गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे, असे सरपंच लता कडताई यांनी सांगितले. जसापूर तलावात गढूळ पाणीच आहे. तलावातून पाणी सोडल्यास नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ येणार आहे. या तीन गावांकरिता एकच पाईप लाईन असून १० दिवसानंतर पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने गुंडभर पाण्यासाठी २ किमी अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. गावाला शुद्ध पाणी मिळावे म्हणून पाण्याच एटीएम यंत्र बसविल. मात्र, ते अद्यापही सुरू झाले नाही. जसापूर तलाव कोरडा झाल्याने मोठे जलसंकट गावकर्यांसमोर उभे ठाकले असून या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा डॉ. तुषार नायकुजी यांनी दिला आहे.