रामनगर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अजय भुसारी ॲक्शन मोडवर….
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : शहरातील रामनगर पोलीस स्टेशन येथे नुकतेच रुज झालल नवीन पोलीस निरीक्षक अजय भुसारी ॲक्शन मोडमध्ये असून त्यांनी रामनगर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. रामनगर हद्दीतील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षितेसाठी त्यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता परिसरात ग्रस्त वाढविण्याचे आदेश दिले असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गावगुंडावर कठोर कारवाई करण्याची संकेत दिले आहे.
रामनगर परिसरातील संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करून परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू,जुगार आणि इतर गैरव्यवहारांवर विशेष तयार करण्यात आलेल्या पथकांकडून कारवाई करून त्यांची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोबतच रामनगर परिसरातील बालविवाह हुंडाबळी आणि महिलांवर अत्याचारासारख्या सामाजिक समस्यांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करणार असल्याचे संकेत दर्शविले आहे. या सर्व उपाययोजनांमधून नवनियुक्त पोलीस निरीक्षक अजय भुसारी हे रामनगर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे समजून येत आहे.