केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड जी यांची खासदार रामदास तडस यांच्या जनसंपर्क कार्यालय वर्धा येथे सदिच्छा भेट

वर्धा/प्रतिनिधी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड जी यांचा वर्धा येथे नियोजीतदौरा दरम्यान त्यांनी रामदास तडस यांच्या जनसंपर्क कार्यालय वर्धा येथे सदिच्छा भेट दिली व कार्यालयाचे कामकाज पाहुन समाधान व्यक्त केले. तसेच सरकार सर्वसामान्यासाठी कार्य करीत आहे, जनसपंर्क कार्यालयाच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनता सेवा करण्यासाठी आपण सदैव तत्पर असालया पाहिजे असे यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले. यावेळी जनसंपर्क कार्यालयात वर्धा जिल्ह्यातून सीबीएसई वर्ग १० च्या परीक्षेत प्रथम येऊन गुणवंत ठरलेल्या गिर्वांन तांबेकर याचा केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवतकराड यांनी पेढा भरवून तसेच शालश्रीफळ देऊन सत्कार केला.

शिवायखासदार रामदास तडस यांनी गिर्वांनयाचे कौतुक करून त्याचा पुष्पगुच्छव भेटवस्तू देऊन सन्मान केला. सोबतच उज्वल भविष्यासाठी व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठीशुभेच्छा दिल्या. यावेळी वडील भालचंद्र तांबेकर, आई प्राजक्ता तांबेकर, बहीण डॉ.मृदुला तांबेकर, आजोबा बाळासाहेब मांढरे, बँकेचे शाखाधिकारी प्रशांत शिर्के, हरिदास ढोक तसेच वर्धा सुवर्णकार समाजाचे पदाधिकारी नितीन कठाने, संजय ढोमने, अमोल ढोमने, राहुल करंडे, किरण गळघाटे, प्रशांत घडे, सागर चित्रीव, सौरभ ढोमने व रवी पैठणकर यांची उपस्थिती होती.