बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक

 बदलापूर/प्रतिनिधी बदलापूर या ठिकाणी सकाळपासूनच तणावाचं वातावरण आहे. दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्यामुळे बदलापुरात नागरिकांचा प्रचंड प्रमाणात रोष पाहण्यास मिळाला. बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर लैंगित अत्याचार केले. या प्रकरणी आरोपीला अटक झाली. आता या आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आंदोलन केलं जातं आहे. बदलापूरमधली एक नामांकित शाळा. या शाळेत घडलेल्या घटनेमुळेच संपूर्ण शहर हादरलं. शाळेत काम करणाऱ्या सफाई कामगाराने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी आरोपीला अटककरण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात गुन्हा दाखल करुन घेणाऱ्यापोलिसांवर कारवाई झाली आहे.