जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीन होत आहे भंगार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : स्थानिक वर्धा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनता उपचाराच्या अशाने दुरून दुरून येत असते. पण आता मात्र रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे व अजत नामक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना एक्स-रे पासून वंचित राहावे लागत आहे. वर्धा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या एक्स-रे मशीन बंद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोविड काळामध्ये एक्स-रे विभागाला पुरविण्यात आलेल्या छोट्या मशीन ने केवळ शरीरातील छोट्या भागांचा एक्स-रे काढता येतो मात्र सुविधा उपलब्ध नसल्याने तात्पुरते काम चालवून एक्स-रे काढणे सुरू होते. मात्र आता छोट्या मशीन वरून रोजची वाढती गर्दी बघता जीवापेक्षा जास्त काम होत असल्याने चक्क त्या मशीनने सुद्धा जीव सोडला आहे. आणि त्यामुळे आता गेल्या दोन दिवसापासून एक्स-रे ची सुविधा पूर्णपणे बंद झालेली होती.

याबाबतची अधिक माहिती जाणून घेतली असता शासनान चठख सेंटर चालू करण्याचे धोरण हाती घेतल्याने रुग्णालयातील सुरू असणारी मशीन चक्क बंद करून भंगारात ठेवल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण बाबींची माहिती वरिष्ठ प्रशासनाला दिल्याचे सांगण्यात आले असून असून सोबतच अजत नामक कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे या प्रकारच्या समस्या निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अश्या परिस्थितीत थातूरमातूर काम करण्यापेक्षा योग्य तो निर्णय प्रशासन का घेत नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *