“गुजरात’च्या रिकाम्या पाकिटांवर वर्ध्यात “प्रिंटिंग’; १४ नामांकित कंपन्यांच्या नावे बोगस बियाणे

वर्धा/प्रतिनिधी वर्ध्यातील बनावट बियाणे विक्री प्रकरणात आता नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आह ेत. ग ुजरातमध ून रिकाम प्लास्टिक पाकिटे वर्ध्यातीलम्हसाळा परिसरातील बोगस बियाणेतयार करणाऱ्या कारखान्यात येत होती. महाराष्ट्रातील १४ नामांकित कापूस बियाणे कंपन्यांची बनावट पाकिटे प्रिंट करून त्यात बियाणे भरून विक्री सुरू असल्याचेपुढे आले आहे. पोलिसांनी या कारखान्यातून ११ लाख १८हजार १३ रुपये किमतीची विविध कंपन्यांची तब्बल १ लाख १८हजार १३ छापील पाकिटे जप्तकेली आहेत. हा कारखाना चालविणारामुख्य आरोपी राजू जयस्वाल हा गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातीलइर् डर य ेथ ून कपाशीच े बनावट बियाणे आणि रिकामे पाकिटेहीआणत होता. म्हसाळा येथीलकारखान्यात महाराष्ट्रात परवानगी असलेल्या बियाण्यांच्या नावाची पाकिटे छापून त्यात बोगसबियाणे भरून रिपॅकिंग करून कृषीकेंद्रांमार्फत शेतकऱ्यांना विकतहोता. या प्रकरणात पोलिसांनीआतापर्यंत दहा आरोपींना बेड्या ठोकल्या असून, ते सात दिवसांच्यपोलिस कोठडीत आहेत.

तीन वर्षांपासून सुरू होता काळाबाजार….

मुख्य आरोपी राजू जयस्वाल हा मागील तीन वर्षांपासून बोगस बियाणे विक्रीचा काळाबाजारकरत होता. सुरुवातीला त्यानेसेलू तालुक्यातील रेहकी येथूनबियाण्यांची विक्री केली. प्रारंभी तो मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथून बनावट बियाणे विकत आणूनकिंग करून विकत होतमात्र, २०२१ मध्ये त्याची ओळखवर्ध्यातील गजू ठाकरे याच्याशीझाली. त्याने राजू जयस्वालयाला अहमदाबादच्या ईडर येथीलराजूभाई आणि महेंद्रभाईशी लिंक जुळवून दिली आणि तेव्हापासून जरातमधून वर्ध्यात बियाणे यायलासुरुवात झाली. यासाठी राजूने गजूठाकरे याला ३.५० लाख रुपये कमिशनही दिले होते. सध्या गजू ठाकरे हा फरार असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत.

महिनाभरापूर्वी म्हसाळ्यात सुरू केला कारखाना…

आरोपी राजू जयस्वाल याने महिनाभरापूर्वी म्हसाळा येथे स्लॅबच्या कच्च्या इमारतीचे बांधकाम १५ दिवसांत पूर्ण केले आणि तेथे बोगस बियाण्यांचे रिपॅकिंग सुरू केले. मात्र, पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी भांडाफोड करून हा कारखाना उद्ध्वस्त केला.

रिपॅकिंग मशीनसह प्रिंटर, २८.२० लाखांची रोकड जप्त..

पोलिसांनी या कारखान्यातून रिपॅकिंग मशीन तसेच प्रिंटर आणि डिजिटल वजनकाटा जप्त केला आहे. प्रिंटिंगसाठी लागणारे पेंटचे डबेदेखील जप्त केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी पथकासह आरोपी राजू जयस्वाल याच्या रेहकी येथील घरी छापा मारून २८ लाख २० हजार रुपयांची रोख जप्त केली आहे.

बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठविले “सॅम्पल’….

पोलिसांनी जप्त केलेले पाशीच्या बोगस बियाणांचे सहा नमुने नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळा आणि सीआयसीआर प्रयोगशाळेत पाठविले असल्याची माहिती आहे.