महावितरणच्या “रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; वीज सुरक्षेसाठी जनजागृती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : महाराष्ट्रात विजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यासाठी महावितरणने आपल्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘विद्युत सुरक्षा सप्ताहा’चा (१ ते ६ जून) प्रारंभ रविवारी (दि. १ जून) “रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनने केला. या मॅरथानला नागपरात उत्स्फत प्रतिसाद मिळाला. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते विद्युत भवन येथे या मॅरेथॉनचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना दोडके यांनी ‘महावितरणमध्ये शून्य अपघात, महाराष्ट्रात शून्य’ ही या सप्ताहाची संकल्पना असल्याचे सांगितले.

नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करण हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दैनंदिन कामात सुरक्षिततेला महत्त्व देण्याबरोबरच कामाच्या ठिकाणी निरोगी वातावरणाची गरजही त्यानी अधोरेखित केली. ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनच्या माध्यमातून महावितरणने विद्युत सुरक्षेच्या महत्त्वावर भर दिला असून, नागरिकांना सुरक्षिततेचे नियम पाळण्याच आवाहन कलआहे. या मॅरेथॉनमध्ये नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमितपरांजपे, नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, नागपूर प्रादेशिक कार्यालयाचेअधीक्षक अभियंता मंगेश वैद्य,चाचणी मंडलाचे अधीक्षक अभियंतावैभव पाटोडे यांच्यासह विविधविभागांचे विभागप्रमुख, अधिकारी,अभियंता आणि कर्मचारी असेतब्बल ७०० जण सहभागी झाले होते. विद्युत सुरक्षा विषयावरील घोषणा, माहितीपत्रके, पोस्टर्स,बॅनर्स आणि व्हिडिओ यांच्यमाध्यमातून यावेळी जनजागृतीकरण्यात आली. २.५ किमीलांबीच्या या मॅरेथॉनचा समारोप प्रकाश भवन, गड्डीगादाम यथ मुख्यअभियंता दिलीप दोडके यांच्याअध्यक्षतेखाली झाला.

कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे महत्त्वसांगतानाच त्यांनी अधिकारी आणिकमचाऱ्यांच्या सक्रिय प्रयत्नांचकौतुक केले. या मॅरेथॉनने शारीरिकआरोग्य आणि सुरक्षिततेच्याजाणिवेला बळ तर दिलेच, पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांमधीलएकता आणि समर्पणाचाही अनुभवदिला, असे दोडके म्हणाले. यावळी संचालक, गाहकव्यवहार ड. गौरी चंद्रायण, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, नागपूर ग्रामीणमंडलाचे अधीक्षक अभियंतासंजय वाकडे आणि नागपूरप्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षकअभियंता मंगेश वैद्य यांच्यासहमॅरेथॉनमधील अनेक मान्यवरउपस्थित होते. मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींचामान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यातआला. विशेष म्हणजे, प्रकाशभवन येथे व्होकॉर्ट हॉस्पिटलच्या सहयोगाने आरोग्य तपासणीशिबिरही आयोजित करण्यात आलेहोते, जिथे सहभागींच्या रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी तपासण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *