पुलगाव शहरात परमात्मा एक सेवकांकडून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुलगांव : परमपूज्य परमात्मा एकसेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत वर्धा पुलगाव परिसरातील परमात्मा एक सेवकांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलायामध्ये प्रांजल मते सि ए डी कॅम्प पुलगाव हिला दहाव्या वर्गामध्ये ९५% त्याचप्रमाणे आयुष हाताघयाला ९२% तर रितेश खेलोकर ८९% असे प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात आले. त्याचप्रमाणेअक्षरा मुळे, नकुल आमझरे, केसरीकुईठे, आरती झाडे, हर्षाली उईके,देवेश कोंडणकर, हिमांशू नारंवरे, निदा धावडे, कुणाल सोनटक्के,यश डोंगरे, हर्षा कुईटे, हिमांशूकापसे, यश उकेटोहाने, तृषासोनटक्के, आयुष भलमे या दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच प्रशंस मते या विद्यार्थ्याला नवोदय विद्यालय सेलूकाटे व सैनिक स्कूल सातारा येथे निवड झाल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने अमरावती यवतमाळ जिल्ह्यातील मार्गदर्शक श्रीमान ज्ञानेश्वरजी लादे, वर्धा येथील श्रीमान शरद हातागरे सर व पलगाव यथील अमरदीपजी नंदनवार, विवेक मेश्राम, डॉ रविंद्र पराते बाबाराव सोनटक्के, सुनील नारनवरे रवींद्र भलमे, प्रदिप मते आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *