एकाच वेळी तीन दुकानांवर मारला छापा; १२.२३ लाखांचा गुटखा जप्त

वर्धा/प्रतिनिधी शहरात एकाच रात्री तीन विविध पथकाने केलेल्या कारवाईत तीन दुकानांवर छापा मारुन तब्बल १२ लाख २३ हजार २११ रुपयांचा सुगंधीत तंबाखू (गुटखा) जप्त करीत तिघांविरुद्ध शहर पोलिसात अन्न व औषध विभागाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या देखरेखीत असलेल्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने २० रोजी रात्रीच्या सुमारास केली. जितेंद्र रुपचंद भाटीया, राहूल जगदीश भाटीया, धर्मदास भाटीया अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपी जितेंद्र भाटीया व त्याचे नातेवाईक शहरातील मुख्य बाजारपेठेतील तीन विविध ठिकाणाहून प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची साठवणूक करुन त्याची शहरातील विविध पानटपरी व इतर ठिकाणी तसेच जिल्ह्यात विक्री करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना मिळाली होती. दरम्यान क्राईम इंटेलिजन्स पथकाच्या चार टीम तयार करण्यात आल्या होत्या. चारही टिमने आरोपी जितेंद्र भाटीया याच्या गोदामाची माहिती काढली. पथकांना चार पैकी तीन गोदामात सुगंधीत तंबाखू गुटखा साठवणूक केल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहिती देत पोलिसांसोबत छापा मारण्याबाबत आदेश दिले.
अन्न व औषध प्रशासनासह पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनी जितेंद्रभाटीया, राहूल भाटीया, धर्मदास भाटीया यांच्या मालकीचे बडेचौकात असलेले प्रिया ट्रेडर्स तसेचमोहता मार्केट परिसरात असलेले मनोज ट्रेडर्स आणि एम.के. गोदामया तिन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा मारला. पोलिस आणि अन्न व औषधप्रशासनाने मारलेल्या छाप्यामध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे प्रतिबंधीतअसलेला सुगंधीत तंबाखूची मोठ्याप्रमाणात साठवणूक केल्याचे दिसूनआले. तसेच विविध कंपन्यांचा सुगंधीत तंबाखू साठा मिळूनआला. पोलिसांनी तिन्ही आरोपींनाअटक करुन दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. ही कारवाई पोलिस अधीक्षकनुरुल हसन, अप्पर पोलिसअधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्यामार्गदर्शनात सहाय्यक पोलिसनिरीक्षक संदीप कापडे, रोशननिंबोळकर, सागर भोसले, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवनदेशमुख, मंगेश आदे, अभिषेक नाईक, हर्शल सोनटक्के, शिरीनशेख, प्रफुल वानखेडे यांनी तसेच अन्न व औषध विभागाचे सहाय्यकआयुक्त जयंत वाणे यांच्यामार्गदर्शनात किरण गेडाम, अमिततृपकाने, संजय धकाते, रमन बावणेयांनी संयुक्तरित्या केली.