शरद पवार दंत महाविद्यालयात कार्यशाळा इम्प्लांटोलॉजीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर

वर्धा/प्रतिनिधी दत्ता मेघे उच्च शिक्षव संशोधन संस्था अभिमतविद्यापीठ संचालित सावंगी येथीलशरद पवार दंत महाविद्यालयातइंडियन सोसायटी ऑफ ओरलइम्प्लांटोलॉजी आणि भारतीयदंतविज्ञान परिषद, वर्धा शाखायांच्या संयुक्त विद्यमाने नवीनडिजीटल तंत्रज्ञानावर आधारित दंतविज्ञान परिषदेच्या वर्धा शाखेचे अध्यक्ष डॉ. मिथिलेश धामंदे, अधिष्ठाता डॉ. मनीज चांडक, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. विद्या लोहे, उपअधिष्ठाता डॉ. अलका हांडे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंजली बोरले, विभाग प्रमुख डॉ. सुरेखा गोडबोले, डॉ. नितीन भोला, डॉ. प्रसाद धाडसे यांची उपस्थिती होती.

कार्यशाळेत तीन चर्चासत्रे व दोन प्रत्यक्ष कृती सत्रे घेण्यात आलीत. पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ओरल इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. जसविंदर सिंग तेजा, छत्तीसगड यांनी तर दुसऱ्या सत्रात इंटरनॅशनल कागस आफ आरल इम्प्लाटालाजी संघटनेच्या आजीव सदस्य डॉ. रेखा शर्मा, दिल्ली यांनी मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात श.प. दंत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लांटोलॉजीचे सचिव डॉ. रिकीन गोगरी, मुंबई यांनी मार्गदर्शन कल. कती सत्रात डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून इम्प्लांटच्या सहाय्याने कमी वेळेत दंतरोपण करण्याची कार्यप्रणाली तसेच वरच्या जबडयाची झीज झाली असता उपलब्ध हाडांमध्ये सायनस लिफ्ट पद्धतीद्वारे इम्प्लांटरोपण कसे करावे, हे प्रात्यक्षिकाद्वारे शिकविल्या गेले. या कार्यशाळेत कृत्रिम दंतशास्त्र विभाग, कृत्रिम परिवेष्टण विभाग व दंत शल्यचिकित्सा विभागातील शिक्षक व सुमारे १०० पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी प्रात्यक्षिक सरावासाठी लागणारे साहित्य डेटियम कंपनीद्वारे प्रायोजित करण्यात आले होते. समारोपीय सत्रात सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले.