हिंगणघाट रेल्वे स्थानकावरील ३ रेल्वे एक्सप्रेस गाड्या पूर्ववत सुरू; खासदार रामदासजी तडस यांच्या पाठपुराव्यामुळे यश

नवी दिल्ली/वर्धा/प्रतिनिधी वर्धा लोकसभा क्षेत्रातील कोविड १९ पुर्वी मंजुर असलेले सर्व रेल्वे थांबे तात्काळ सुरु करावे तसेच प्रामुख्याने हिंगणघाट व चांदूर येथे रेल्वे गाडयांचे थांबे पुर्ववत करण्यात यावे परिस्थितीमुळे रेल्वे थांबे व रेल्वेसेवा प्रभावीत झालेली होती सदर सेवा पुर्ववत करण्याकरिता व लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर चर्चा करण्याकरिता रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आपल्या मागण्या या प्रमुख मागणीसाठी वर्धा त्यांच्यासमोर प्रस्तुत केलली लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी नवी दिल्ली येथे केन्द्रीय मंत्री श्री. अश्विनी वैष्णव जी यांची भेट घेतली होती, त्या यत्नाला यष मिळाले असुन हिंगणघाट रेल्वे स्टेशनवर ट्रेन क्र. १६०३१/३२ चेन्नई-श्री माता वैष्णो देवी टरा अंदमान एक्स्प्रेस, १२९६७/६८ चेन्नई-जयपूर एक्स्प्रेस आणि १२५११/१२ गोरखपूर-कोचुवेली राप्तीसागर एक्स्प्रेसच्या थांब्याला स्विकृती मिळालेली आहे, याबाबतचे पत्र केन्दीय मंत्री श्री. अश्विनी वैष्णव जी यांनी खासदार रामदास तडस यांना प्राप्त झाले असुन याबाबत नोटीफीकेशन मध्य रेंल्वे व्दारा काढलेले आहे.

कोविड-१९ च्या काळात असाधारण होती हिंगणघाट येथे पुर्वी १७ गाडयांना स्टॉपेज होते पंरतु फक्त ४ गाडयांना स्टॉपेज मंजुर असल्याचे मंत्री यांच्या समोर उपस्थित करुन अवगत केले, माझ्या प्रयत्नाला यश मिळालेले असुन ट्रेन क्र. १६०३१/३२ चेन्नई-श्री माता वैष्णो देवी कटरा अंदमान एक्स्प्रेस, १२९६७/६८ चेन्नई-जयपूर एक्स्प्रेस आणि १२५११/१२ गोरखपूर-कोचुवेली राप्तीसागर या गाड्यांचा समावेश आहे. पुढील काळात लवकरच लोकसभा मतदरसंघांतील सर्व गाड्या पूर्ववत सुरू होतील असा विश्वास व्यक्त करून खासदार रामदासजी तडस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस यांच्याप्रती आभार व्यक्त केले.