भाजप निरीक्षकांनी घेतली झाडाझडती; आमदारांशी “वन बाय वन’ चर्चा, अंतर्गत कुरघोडी उघड

वर्धा/प्रतिनिधी लोकसभेत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाने विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी शनिवारी जिल्ह्यातील पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी “वन बाय वन’ चर्चा करून झाडाझडती घेतली. यात पक्षातील अंतर्गत कुरघोडीही उघड झाली. लोकसभेतील पराभवाची भाजपने गंभीर दखल घेतली आहे. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा शरद पवार गटाच्या नवख्या उमेदवाराने पराभव केला. त्यामुळे हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. सुमारे वर्षभरापासून बूथ बांधणी करूनही पराभव पत्करावा लागल्यान भाजपाचे अंतर्गत नियोजन कोलमडल्याचे उघड झाले आहे. बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि जिल्हा पदाधिकारी लोकसभेच्या परीक्षेत फेल झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाने आमदार प्रवीण दटके यांना जिल्ह्यात पाठविले आहे.

आमदार दटके यांनी शनिवारी आर्वी मार्गावरील एका “पॅलेस’मध्ये आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी “वन बाय वन’ चर्चा करून पराभवाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम बैठकीत केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार स्थापन झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पारितकरण्यात आला. त्यानंतर आमदार दटके यांनी आमदारांना एक-एक बोलावून चर्चा केली. वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर आणिआर्वीचे दादाराव केचे यांनी त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार एका अंत्ययात्रेत असल्याने उशिरापोहोचले होते. आमदारांनी आपापल्यापरीनेपराभवाची कारणे सांगितली. त्यानंतर जिल्हापदाधिकाऱ्यांकडून “वन बाय वन’ पराभवाचीकारणे जाणून घेण्यात आली. यात काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षातील अंतर्गत नियोजनावर बोट ठेवल्याचे सांगितलेजाते. पक्ष निरीक्षक आमदार प्रवीण दटके यांनी चर्चेत पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याचे सांगितले जात आहे. निरीक्षकझाडाझडती घेत असताना पक्षातील अंतर्गतकुरघोडी उघड झाल्याचे सांगितले जाते.