महाविकास आघाडीत बिघाडी; उद्धव ठाकरेंवर नाना पटोले नाराज?

मुंबई/प्रतिनिधी लोकसभा निवडणुका संपताच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षकआणि पदवीधर मतदारसंघाच्याचार जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून २६जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये मुंबई शिक्षक, मुंबईपदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचासमावेश आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीतील उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गट आणिकाँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडलीआहे. ठाकरे गटाने कोणतीहीचर्चा न करता परस्पर चारहीजागांवर उमेदवार घोषित केल्यामुळेकाँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यातयेत आहे.

शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेच्या चारही जागांवर आपलेउमेदवार घोषित केले आहेत.यावरून महाविकास आघाडीचबिघाडीची चर्चा सुरू झाली आहे.यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षनाना पटोले आणि काँग्रेसचे प्रभारीरमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनीप्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंनी माझाफोन घेणं टाळलं असून त्यांच्या मनात काय?, याबाबत सवालउपस्थित केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.