देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!

नवी दिल्ली/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, महायुतीचे सर्वच नेते निराश झाले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यासंदर्भात ते बोलत आहेत. त्यातच, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारीस्वीकारली होती. तसेच, वरिष्ठांनीमला सरकारमधून दूर करावे, अशीविनंती मी त्यांच्याकडे करणार आहे,असे म्हणत उपमुख्यमंत्री पदावरुन आपण दर हाणार असल्याचफडणवीस यांनी म्हटले होते.फडणवीसांच्या या विधानानंतरराज्यात चांगलाच गदारोळ माजला.भाजपच्या नेत्यांनीही फडणवीसांच्याया निर्णयाला विरोध केला होता. आता, दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनीयाबाबत थेट आदेशच दिला आहे. तुमचे काम सुरु ठेवा,शपथविधीनंतर सविस्तर बैठकहोईस, असे अमित शाह यांनीदेवेंद्र फडणवीसांना म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा दोन वेळा केंद्रीयगृहमंत्री अमित शाह यांची भेटघेतली. त्यामुळे, कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसर्या भेटीत पूर्ण झाल्याचे समजते. फडणवीस यांचेसंपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतरआपण महाराष्ट्राबाबत सविस्तरचर्चा करुन निर्णय करु. महाराष्ट्रातकाय करेक्टिव्ह उपाययोजना केल्यापाहिजेत, याचा आराखडा तयार करू. पण, तोवर तुम्ही आपले कामसुरू ठेवा, असा सल्लाच अमित शाहयांनी फडणवीसांना दिला. दरम्यान, देवेंद्र फडणवीसयांनी सरकारमधून मला मोकळेकरा, अशी विनंती केल्यानंतरआजच्या अमित शाहांच्या भेटीलामहत्त्व प्राप्त झाले होते. मात्र,आजच्या बैठकीनंतर फडणवीसांच्याविनंतीवरील निर्णय तुर्तास लांबणीवरपडला असल्याचे दिसत आहे.