आष्टीत घरकुल लाभार्थ्यांचा जन आक्रोश मोर्चा

आष्टी (श.)/प्रतिनिधी आष्टी शहरात कित्येक महिन्यापासूनघरकुल लाभार्थींला निधी प्राप्त न झाल्याने ॲड. मनिष ठोंबरे यांच्या नेतृत्वातशेकडो घरकूल लाभार्थ्यांनी मोर्चा काढून नगरपंचायत कार्यालयावर धडक दिली.आष्टी नगरपंचायतमध्ये १०९४ घरकूल मंजूरझाले असून पहिल्या यादीत २६७ मंजूरलाभार्थी, दुसर्या यादीत ४४९ तर तिसर्या यादीत ३७८ घरकुल मंजूर झाले आहे. ४ वर्षे होऊन पहिल्या व दुसर्या यादीतील मंजूरलाभार्थ्यांचे ९० हजार रुपयांचे तिसरा टप्पा नमिळाल्याने जनता त्रस्त झाली आहे. त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. पहिली व दुसरी यादीला मंजुरी देताना राज्यात महाविकास आघडीचे सरकारअसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीमहत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात दिरंगाईकेल्याने राज्य सरकारने महत्त्वाचे निकष पूर्ण न केल्याने ही वेळ आली आहे असा आरोपअशोक विजयकर यांनी केला.

तिसरी यादी ही डिसेंबर २०२२ मध्ये मंजूर झाली असून त्याचा निधी सुद्धा प्राप्त झाला होता. परंतु, अभियंता येनुरकर यांनी १३ फेब्रवारी रोजी राजीनामा दिल्याने व नवीन अभियंत्यांची नियुक्तीसाठी २ महिन्याचा कालावधी लागल्याने ३१ मार्च रोजी अखर्चित निधी शासनाने परत घेतला. त्यामुळे बहुतांश लाभार्थी हे पहिल्या टप्प्याच्या नधीपासून वंचित आहेत. नगरपंचायत प्रशासनाने येनुरकर यांना ४५ दिवसाच्या कायदेशीर नोटीस कालावधीवर ठेवले असते तर ही वेळ आली नसती असा आरोप ॲड. मनिष ठोंबरे यांनी केला. या मोर्चात आ. दादाराव केचे यांनी भेट दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करेल व लवकरच यातून मार्ग काढून घरकुल लाभार्थ्यांना न्याय देईल असे आश्वासन आ. केचे यांनी दिले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सहकारी सुमित वानखेडे यांच्या सोबत फोन व चर्चा केली असता सर्व घरकुल लाभार्थ्यांंना लवकरच निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष कमलाकर निंभोरकर, चंद्रशेखर मदनकर, अजय लेकुरवाळे, अवेज खान, प्रज्वल चोहटकर, प्रज्वल हिरुडकर, गजानन कदम, मंगेश कोहळे, सतीश हिरुडकर, भावेश म्हात्रे, आदींसह असंख्य लाभार्थी उपस्थिस्त होते.