वर्धा जिल्ह्यात मुलींचाच बोलबाला

वर्धा/प्रतिनिधी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनघेण्यात आलेल्या इयत्ता दहावीबोर्डाचा निकाल सोमवार २७ रोजीदुपारी १ वाजता जाहीर झाला. दरवर्षीप्रमाण यदाही मुलींनीचबाजी मारत आर्वी येथीलविद्यानिकेतन इंग्लिश हायस्कूलचीसाक्षी मनोज गांधी हिने ९९.८० टक्के गुण घेऊन नागपूर विभागतसेच वर्धा जिल्ह्यातून प्रथमयेण्याचा मान मिळवला. तर याच शाळेतील सृष्टी अमित राठी हिने ९८.४० टक्के, तर स्वरा पंकजजाधव हिने ९८.२० टक्के गुणघेऊन जिल्ह्यातून अनुक्रमे द्बितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. १ ते २६ मार्च दरम्यान दहावीच्यापरीक्षा पार पडल्या. जिल्ह्यातील १६ हजार३९३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेहोते. त्यापैकी १६ हजार २२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

या परीक्षेत १४ हजार ७७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७ हजार५२५ मुले तर ७ हजार २४६मुलींचा समावेश आहे. यावर्षीजिल्ह्याचा निकाल ९२.२ टक्केलागला आहे. जिल्ह्यातीलएकूण शाळांपैकी ८४ शाळांचानिकाल १०० टक्के लागला.साक्षी गांधी हिने ९९.८० टक्केगुण घेऊन नागपूर विभाग तसेच वर्धा जिल्ह्यातून अव्वल ठरली. साक्षीचे वडील अडते व्यापारीअसन आइ गृहिणी आह. पढअभियात्रिकी शाखतन सगणकअभियंता होण्याचा मानस तिनेबोलून दाखवला आहे. नियमित अभ्यास व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे यश प्राप्त केल्याचे तिनेसांगितले.