सेवाग्राम आश्रम व एमगिरी गांधी विचारांची सजीव केंद्रे- केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रम आणि एमगिरी या संस्था स्वदेशी, आत्मनिर्भरता व सामाजिक समरसतेच्या गांधीजींच्या विचारांची सजीव केंद्रे आहेत. एमगिरी भविष्यातील पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी केले. सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी ५ जानेवारीला महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी), वर्धा येथे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा तसेच नवीन प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होत्या.

बैठकीस एमएसएमई मंत्रालयाचे संयुक्त सचिव विपुल गोयल, संचालक (एआरआई) अशोक शर्मा, जिल्हाधिकारी वान्मथी सी., माननिय केंद्रीय राज्यमंत्री मुक्ष्म, लघु और मध्यम उप मंत्रालय तथा श्रम और रोजगार मंत्रालय भारत सरकार वर्धा न.प. चे मुख्याधिकारी विजय देशमुख, एमगिरीचे संचालक डॉ. आशुतोष मुरकुटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शोभा करंदलाजे पुढे म्हणाल्या, देशात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामोद्योगसशक्त करण्यासाठी, तसेच ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीस चालना देण्याच्यादृष्टीनेमहात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था(एमगिरी) महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.महात्मा गांधींच्या ग्रामोद्योगावर आधारित सशक्त भारत निर्मितीच्या संकल्पनेला एमगिरीसाकार करत आहे.

देशभरातील हजारा कारागीर, महिला, शेतकरी, युवक, खादी संस्था व गोशाळा एमगिरीद्वारे विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहे. एमगिरीच्या सर्वांगीण विकासासाठी जनसहभागिता सातत्याने सक्रिय आहे. वर्धा ही भूमी महात्मा गांधींशी निगडित आहे. त्यांची ग्रामाभिमुख विचारसरणी, ग्रामीण उद्योग व स्वावलंबनाची संकल्पना याच परिसरातून विस्तारास सुरुवात झाली. एमगिरीने विकसित केलेली सोलर पॉवर पॅक व पोर्टेबल सोलर पॉवर्ड बॅटरी चार्जर ही तंत्रज्ञान प्रणाली भारतीय सेनेला हस्तांतरित करण्यात आली आहे. तिचा वापर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरदरम्यान केला. तसेच वर्धा येथे टेक्सटाईल्स क्लस्टर उभारण्याच्या प्रकल्पावर सरकार विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अशुतोष मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयकिशोर छांगाणी यांनी केले. प्रसंगी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *