प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : दिनांक ०९/०१/२०२६ रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकचे अंमलदार मा. वरीष्ठाचे आदेशाने वाँश आउट मोहीम राबवित असतांना मुखबीरकडून खात्रीशीर खबर मिळाली की, अनिता भोसले रा. तरोडा पारधी बेडा ही तिचे घराचे मागील बाजुस असलेल्या खाली जागेत झाडाझूडूपामध्ये अवैद्यरित्या गावठी मोहा रसायान सडवा गाळीत आहे, अशी मुखबीरकडून खात्रीषीर माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकचे अंमलदार हे खाजगी वाहनाने रवाना होवून मोक्यावर पोहचून पाहणी केली असता मोक्यावर १) ४ मोठे प्लाँल्टीक ड्रममध्ये प्रती लिटर २०० लिटर प्रमाने ८०० लिटर कच्चा मोहा रसायन सडवा प्रती लिटर ८० रू प्रमाने ६४,००० रू २) १२ लहान प्लाँस्टीक ड्रममध्ये प्रती लिटर १०० प्रमाने १२०० लिटर कच्चा मोहा रसायन सडवा प्रती लिटर ८० रू प्रमाने ९६,००० रू ३) जमीनीत गाडुन असलेले १० प्लाँस्टीक ड्रम मध्ये अंदाजे १०० लिटर प्रमाणे १००० लिटर कच्चा मोहा सडवा प्रती लिटर ८० रू प्रमाने ८०,००० रू ४) २२ छोटे प्लाँस्टीक ड्रम प्रती ड्रम ३००/- रू प्रमाणे ६,६००/- रू ५) ४ मोठे प्लाँस्टीक ड्रम प्रती ड्रम ४०० रू प्रमाने १६०० रू असा एकुण जुमला किमत २,४८,२०० रू चा मुद्देमाल मिळून आल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जागीच नाश करून सदर महिला आरोपीविरूध्द दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद केला- ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक साहेव सा., मा.पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. हिंगणघाट यांचे आदेशान पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. रोहीत साठे, पोशी मंगेश वाघमारे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.