डायल ११२ वर केला फेक कॉल तर तुरुंगात जाल, दंडही भरावा लागेल

वर्धा/प्रतिनिधी डायल ११२ या हेल्पलाइनवर कॉल करताच काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळावर पोहचतआहेत. त्यामुळे अडचणीतसापडलेल्यांना दिलासा मिळतआह. मात्र, काही जण फेककॉल करीत असल्याचे प्रकारही उघडकीस येत असल्याने अशालोकांवर आता थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.

यात दोषीआढळल्यास कारावास व दंडाची शिक्षाही होऊ शकते. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत नियंत्रण कक्षात तब्बल ५,६१९ कॉल्स प्राप्त झाले असून, अवघ्या १० मिनिटांत पोलिसमदतीला धावल आहत. अडचणीसापडलल्या लाकांना तत्काळ मदमिळावी, यासाठी डायल ११२ हीहेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. यावर कॉल येताच काही मिनिटांतच पालिस पथक घटनास्थळी दाखल होते. अपघातग्रस्तांसाठी ही सेवा देवदूतच ठरत आहे. अनेकांचे प्राण वाचविण्यात पथकाला आले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या मदतीलाही है पथक धावत आहे. त्यामुळे मदत मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, काही टवाळखोर गंमत म्हणून कॉल करीत आहेत. अशावेळी मदतीची खरोखरच गरज असलेल्या व्यक्तीचा कॉल प्रतीक्षेत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांची आता खैर नाही.