पोलीस- नक्षल चकमकीत कमांडर वासूसह दोन महिला नक्षल्यांना कंठस्नान, घटनास्थळाहून मोठा शस्त्रसाठा जप्त

घातपात घडवून आणण्याच्यातयारीत असलेल्या नक्षलवाद्यांचा कट उधळून लावत सी- ६०जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.यात पेरमिली दलमचा प्रभारी व नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचाकमांडर वासू याच्यासह दोन महिलानक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यातगडचिरोली पोलिसांना यश आले.१३ मे रोजी सकाळी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा येथीलजंगलात ही चकमक उडाली. नक्षल्यांचा सध्या “टीसीओसी’कालावधी सुरु आहे.

यात पेरमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसराततळ ठोकून बसल्याची माहितीपोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनामिळाली होती. त्यानुसार, त्यांनी विशेष अभियानचे अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी- ६० जवानांच्यादोन तुकड्या तातडीने परिसरात शोधासाठी रवाना केल्या. पथके परिसरात शोध मोहीम राबवतअसताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावरअंदाधुंद गोळीबार केला, सी-६०जवानांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तरदिले. गोळीबार थांबल्यानंतर आणिपरिसराची झडती घेतल्यानंतर एकपुरुष आणि २ महिला नक्षलवाद्यांचेमृतदेह आढळले. पेरमिली दलमचेप्रभारी आणि विभागीय समितीचा कमांड वासू याचा मृतदेह असल्याचेनिष्पन्न झाले आहे. इतर दोनमहिला नक्षल्यांची अद्याप ओळखपटलेली नाही.