मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या १० ‘गँरटी’

नवी दिल्ली/प्रतिनिधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांसाठीनागरिकांसमोर जाहीरमाना सादरकेला आहे. यावेळी त्यांनीनागरिकांना १० गँरटी दिलीआहे. त्यांनी म्हटलं आहे की,’ही केजरीवालची गँरटी आहे. मी ही गँरटी घेतो की इंडिया ब्लॉकचं सरकार बनल्यानंतर ही गँरटी पूर्ण करेन. ही गँरटी भारताचं व्हिजन आहे.

आजकाल देशात ‘मोदीकी गँरटी’ यावर चर्चा होतेय. पण आता देशाने ठरवावे मोदी कीकेजरीवाल काणाच्या गरटीवरविश्वास ठेवायचा.’ केजरीवाल यांनी म्हटलंआहे की, पंतप्रधान मोदी यांनी १५ लाख रुपये, प्रत्येक वर्षी २ कोटींचे रोजगार, स्वामीनाथनरिपोर्ट, २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, २४ तास वीज, १५ ऑगस्ट २०२२पर्यंत साबरमतीआणि मुंबईसाठी बुलेट ट्रेन, १००स्मार्ट सिटीची गँरटी दिली होती. मात्र एकही गँरटी पूर्ण झालेलीनाहीये. केजरीवाल यांनी पुढेम्हटलं आहे की, आम्ही शाळा, मोहल्ला क्लिनीक बनवून आमची गँरटी पूर्ण केली आहे. एकीकडे मोदींची गँरटी आहे तर एकीकडे केजरीवालांची गँरटी आहे.