मशागतीच्या कामांना वेग; बैलजोडी ऐवजी यंत्रांचा वापर

सिंदी रेल्वे/प्रतिनिधी गेल्या पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसानतर शेतकर्यांनी परणीपर्व मशागतीकड मोर्चा वळविला आहे. सध्या भर उन्हात बैलजोडीच्या मदतीने शेतीची कामे करण्याऐवजी यंत्रांच्या सहाय्यानेच कामे करण्यास प्राधान्य दिल जात आह, ह विशष! शेतकरी मृगछाया पडण्याची चिन्हे दिसली म्हणजे पेरणीपूर्व मशागतीच्या कामी लागतात. यंदा मात्र उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्याचा अनुभव १० दिवसांपासून येत आहे. परिणामी, हंगामात धावपळ करुन मशागतीची कामे करण्यापेक्षा अवकाळी पावसामुळे नरम पडलेल्या जमिनीची मशागत करणेच बरे समजून बहुतांश शेतकरी कामाला लागले आहेत. दोन दशकांपासून लाख रुपयांची बैलजोडी पोसण्यापेक्षा ट्रॅक्टरनेच मशागतीची कामे करण्याकडे शेतकर्यांचा कल आहे. प्रत्येक गांवखेड्यात अलिकडे ट्रॅक्टर पोहचला आहे. चार पैसे जादा द्यावे लागतात.

पण, वेळेत काम पूर्ण करुन घेता येते ही सबब लक्षात घेत अनेकांनी बैलजोडी ऐवजी यंत्रांना पसंती दिली आहे. आचारसंहिता आहे व डिझेलचे दर देखील स्थिर असल्यामुळे शेतकर्यांची पहिलीपसंती यंत्रांना आहे. येत्या १५ तारखेपासून कपाशीचे बियाणे विक्रीला सुरुवात होणार आहे. यावर्षी बियाण्यांची टंचाई नसेल असेकृषी तज्ज्ञांचे मत आहे. सोयाबीनचे बियाणेमिळवण्यासाठी आटापिटा करण्याची पाळी शेतकर्यांवर येणार नाही. अनेकांनी उन्हाळी सोयाबीन बियाणे वापरण्याची तरतूद केली आहे. कपाशीचे अप्रमाणित बिटी-३ बियाणेंविकण्यासाठी अनेक दलाल खेडोपाडी चकरामारतांना दिसतात. यंदा ५२ टक्के क्षेत्रफळात सोयाबीन आणि ४० टक्के क्षेत्रफळातकपाशीची लागवड होईल, असे शेतकरी सांगतात. अक्षय्यतृतीयेला किमान ५२ टक्के मशागतीची कामे आटोपली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.