निसर्गप्रेमींना पाणस्थळावरील मचाणीवर वन्यजीव निरीक्षणाची संधी

वर्धा/प्रतिनिधी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील पाणस्थळांवर दि. २२ व २३ रोजी बुद्धपौर्णिमेला निसर्गानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात वन्यजीव अभ्यासक तसेच निसर्गप्रेमी नागरिकांना सहभागी होऊन पाणस्थळावरील मचाणीवरून वन्यजीव निरीक्षणाची संधी प्राप्त होणार आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील जुन्या व नवीन वनक्षेत्र तसेच हिंगणी, बांगडापूर व कवडस बफर या वनपरिक्षेत्रात नैसर्गिक पाणस्थळे तसेच कृत्रिम पाणवठ्यांजवळ ३५ मचाणी निर्माण करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी पावसाच्या संभाव्यतेमुळे हा उपक्रम टाळण्यात आला होता. मात्र यावर्षी संरक्षित वनक्षेत्रातील नवनिर्मित मचाणीवर बसून वन्यजीव निरीक्षणासह अरण्यवाचनाची संधी १८ वर्षे वय पण झालल्या नागरिकाना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उपक्रमात स्वेच्छेने सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींना दि. २२ मे रोजी दुपारी ३ वाजतापासून दुसऱ्या दिवशी दि. २३ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मचाणीवर बसून निरीक्षणे नोंदवावयाची आहेत. या निसर्गानुभव कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठीwww.penchtigerreserve.
maharashtra.gov.in किंवा www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. हा अर्ज डाऊनलोड करून व त्यात परिपूर्ण माहिती भरून बोर व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या वषेुश्रलेीारहरषेीशीीं.सर्ेीं. ळप या ईमेलवर दि. २० मेपूर्वी पाठवावा. आधी येणाऱ्या अर्जाला क्रमानुसार प्राधान्य देण्यात येईल. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या स्त्रीपुरुष नागरिकांना निसर्गानुभव कार्यकमाच्या सव नियम व अटींचे पालन करणे अनिवार्य आहे, असे बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी कळविले आहे.