मोदी हटाओ नही, परिवार बचाओ बैठक; देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका

मुंबई/प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आज बिहारमधील पाटणा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव जगभर गाजत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांना हे पाहवत नसल्याने ते आज एकत्र आले आहेत. हाच धागा पकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीचा “मोदी हटाओ नही, परिवार बचाओ बैठक’, असा उल्लेख करत जोरदार टीका केली. आज पाटणामध्ये सगळे परिवारवादी पक्ष एकत्र आले आहेत आणि आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहू शकेल हा त्यांचा हेतू आहे. कारण यांच्यासाठी राज्य चालवणं हा धंदा आहे, तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ती सेवा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले, मागच्याही काळामध्ये २०१९ ला या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन पाहिलं होतं पण जनता मोदीजींच्याच पाठीशी आहे आणि आता तर २०२४ मध्ये मागच्या वेळेपेक्षाही जास्त ताकदीनेजनता मोदीजी आणि एनडीए पक्षाच्यापाठीशी उभी राहील. त्यामुळे अशा प्रकारचे कितीही मेळावे विरोधकांनीकेले तरी त्याचा परिणाम होईल, असं मला वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले,एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की सातत्याने मेहबुबा मुफ्तींच्यानावावर भाजपला टोमणे मारणारेउद्धव ठाकरे आता मेहबुबामुफ्तींसोबत तर चाललेच आहेतपण त्यांच्या बाजूलाच बसले आहेत.त्यामुळे सत्तेकरता आणि परिवारवाचवण्याकरता सगळ्या प्रकारच्या तडजोडी करण्यासाठी हे तयार आहेत,पण याचा कुठलाही परिणाम होईल,असं मला बिल्कुल वाटत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला.